गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र होईल, असा दावा करत आहेत. अर्थात त्यासाठी अजून बऱ्याच वर्षांचा पल्ला गाठायचा आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, हे लक्ष्य भारत निश्चित कालावधीत गाठेल. पण पाकिस्तान टॉप-10 देशात येईल, हे भाकित अनेकांच्या काही पचनी पडताना दिसत नाही. चीनची अर्थव्यवस्था सध्या नाजूक अवस्थेतून जात असली तरी ती अनेकांना मात देणार असल्याचे भाकित आहे. म्हणजे भारतासह त्याचे दोन हाडवैरी जगावर राज्य करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
चीन होईल दादा
जगातील सर्वात मोठी गुंतवणूक फर्म गोल्डमॅन सॅशने हा अंदाज वर्तविला आहे. या संस्थेनुसार, येत्या काही वर्षात जगाचा आर्थिक नकाशाच नाही तर नेतृ्त्व पण बदलणार आहे. सध्या अमेरिका हा जगाचा दादा आहे. पण काही वर्षातच त्याचा हा मुकूट चीन खेचून घेणार आहे. चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत असेल तर टॉप-10 अर्थव्यवस्थेत पाकिस्तान पण असणार आहे.
या फर्मनुसार, जगावर राज्य करणारा इंग्लंड आणि आशियातील दुसरी सर्वात शक्तीशाली अर्थव्यवस्था असलेला जपान टॉप-10 यादीतून बाहेर फेकले जाईल. तर या यादीत युरोपमधील केवळ जर्मनी हा देश असेल. इतरही अनेक अंदाज या फर्मने नोंदवले आहेत.
World’s biggest economies in 2075, projected by Goldman Sachs:
🇨🇳 China: $57 trillion
🇮🇳 India: $52.5 trillion
🇺🇸 United States: $51.5 trillion
🇮🇩 Indonesia: $13.7 trillion
🇳🇬 Nigeria: $13.1 trillion
🇵🇰 Pakistan: $12.3 trillion
🇪🇬 Egypt: $10.4 trillion
🇧🇷 Brazil: $8.7 trillion…— World of Statistics (@stats_feed) April 11, 2024
50 वर्षांनी काय असेल स्थिती
कधी घडेल हा बदल