नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून (Sri Lanka Crisis) जात आहे. श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. चलनाच्या मुल्यात मोठ्याप्रमाणात घसरण झाल्याने, अत्यावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेल (Petrol,Diesel) आणि गॅसच्या (Gas) खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, सरकारला पेट्रोलपंपावर सैन्यबळ तैनात करण्याची वेळ आली आहे. श्रीलंका संकटात सापडली असताना आता श्रीलंकेच्या मदतीला भारत धावून गेला आहे. भारताच्या पुढाकारामुळे श्रीलंकेतील नागरिकांना आपल्या रोजच्या गरजा भागवण्यास मदत मिळत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, भारताकडून श्रीलंकेला 500 मिलियन डॉलरची लाइन ऑफ क्रेडिट एलओसी देण्यात आली आहे. भारताच्या या मदतीमुळे तिथल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एस जयशंकर हे आपला मालदीवचा दौरा आटपून श्रीलंकेमध्ये पोहोचले आहेत.
श्रीलंकेमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिक इंधनासाठी तासंतास रांगेत उभे राहात आहेत. एवढे करून देखील पेट्रोल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये गोधळ निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल, डिझेलच्या रांगेमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यानंतर श्रीलंकन सरकारने पेट्रोल पंपावर सैन्यदल तैनात केले आहे. याबाबत बोलताना श्रीलंकन सेनेचे प्रवक्ता नीलांथा प्रेमारत्ने यांनी सांगितले की, पेट्रोल भरण्यासाठी तासंतास लाईनमध्ये उभे राहिल्याने तीन वृद्धांचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून पेट्रोलपंपावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.
श्रीलंकेत केवळ पेट्रोल, डिझेलच नाही तर खाण्या-पिण्याच्या गोष्टी देखील महाग झाल्या आहेत. देशात अन्न -धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यावश्यक वस्तुचे दर दहा ते वीस पटीने वाढले आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, सरकारवर आर्थिक आणिबाणी लावण्याची वेळ आली आहे. श्रीलंकेच्या चलनामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी घसरण झाली आहे.
एफएमसीजी कंपन्यांना युद्धाचा फटका; महागाई उच्चस्थरावर, विक्रीचे प्रमाण घटले
इंधन दरवाढीनंतर आता ‘टोलधाड’; सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार!