Whisky : परदेशी मद्याचा महापूर! या व्हिस्कीने भारतीयांना लावले ‘वेड’

| Updated on: Feb 14, 2023 | 10:37 AM

Whisky : भारतात स्कॉच व्हिस्कीची मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत या मद्याच्या आयातीत रेकॉर्डब्रेक वाढ झालेली आहे. भारतीय या व्हिस्कीचे दीवाणे झाले आहेत. त्यामुळे देशात कोट्यवधी बॉटलची आयात होत आहे.

Whisky : परदेशी मद्याचा महापूर! या व्हिस्कीने भारतीयांना लावले वेड
Follow us on

नवी दिल्ली : भारतात परदेशी मद्याची मागणी वाढली आहे. आकड्यांवरुन देशात विदेशी मद्याचा महापूर आल्याचे दिसून येते. भारतीय गोऱ्या साहेबांच्या स्कॉट व्हिस्कीचे दीवाणे झाले आहेत. इंग्लंडच्या स्कॉट व्हिस्कीवर (UK Scotch Whisky) भारतीयांच्या उड्या पडल्या आहेत. ब्रिटनच्या या स्कॉच व्हिस्कीच्या विक्रीत भारताने फ्रांसलाही (France) मागे टाकले आहे. स्कॉटलँडच्या प्रमुख उद्योगातील आकडेवारीवरुन ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यानुसार, 2022 मध्ये भारतात इंग्लंडच्या स्कॉच व्हिस्कीची आयात (Import) 60 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे इंग्लंडमधील कंपन्यांसाठी भारत ही मोठा मद्य बाजार ठरत आहे. भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 21.9 कोटी बाटल्या आयात केल्या. तर फ्रान्सने इंग्लंडमधून स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 20.5 कोटी बाटल्या आयात केल्या. भारतीय स्कॉच मार्केटमध्ये गेल्या दशकात 200 टक्के वाढ नोंदवली आहे. मद्याचा महापूर आला आहे.

स्कॉच व्हिस्की असोसिएशननुसार, आयातीच्या आकड्यांनी सर्वांनाच अंचबित केले आहे. पण भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये स्कॉचच्या व्हिस्कीचा वाटा केवळ 2 टक्के आहे. भारतात स्कॉच व्हिस्कीच्या आयातीवर 150 टक्के शुल्क आकारले जाते. तरीही आयातीत मोठी वाढ होत आहे.

भारत आणि ब्रिटनदरम्यान फ्री ट्रे़ड ॲग्रीमेंट (FTA) एक महत्वाचा मुद्या आहे. दोन्ही देशात हा करार झाल्याने, स्कॉटलँडच्या व्हिस्की कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. स्कॉच व्हिस्की असोसिएशनच्या दाव्यानुसार, येत्या पाच वर्षांत या आयातीत एक अब्ज पौंडची वृद्धी होईल.

हे सुद्धा वाचा

व्हिस्की उद्योगात एकट्या स्कॉटलँडमध्ये 11,000 लोकांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये 7,000 उद्योग ग्रामीण भागात आहेत. पुर्ण इंग्लंडमध्ये 42,000 हून अधिक लोकांच्या हाताला या व्हिस्की उद्योगाने रोजगार दिला आहे. एफटीएच्या मुद्यावर दोन्ही देशात पूर्ण सहमती झाली तर दोन्ही देशांना त्यातून मोठा फायदा होईल.

गेल्या वर्षी जगभरात 6.2 अब्ज पौंडची व्हिस्की आयात करण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आयातीत 37 टक्के वृद्धी नोंदविण्यात आली. ब्रिटन हा व्हिस्कीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक आहे. इंग्लंडने सर्वाधिक स्कॉच अमेरिकाला निर्यात केली आहे. स्कॉटलँडकडून अमेरिकेला 105.3 कोटी डॉलरची व्हिस्की पाठविण्यात आली आहे. तर भारताला 28.2 कोटी पौंडची व्हिस्की पाठविण्यात आली आहे.

भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 21.9 कोटी बाटल्या आयात केल्या. तर फ्रान्सने इंग्लंडमधून स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 20.5 कोटी बाटल्या आयात केल्या. यामुळे रोजगार वाढल्याचा दावा इंग्लंडचे उद्योग आणि व्यापार मंत्री निगेल हडलस्टन यांनी केला आहे. निर्यातीचे आकडे मन प्रसन्न करणारे असल्याचे ते म्हणाले.