नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी अर्थसत्ता (Third Economy) होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. मोदी यांनी 2028 चा उल्लेख केला. अमेरिका, चीन नंतर भारताची अर्थव्यवस्था असेल असे त्यांनी सांगितले. अर्थात हा दावा त्यांनी हवेत केलेला नाही. भारताने दुसऱ्या टर्ममध्ये जोरदार मुसंडी मारली. मंदीसदृश्य घडामोडीत इतर अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या असताना भारताचे वारु उधळले आहे. ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर, मेडिसीन, टेक्नॉलॉजी या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. पुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन होण्याचा अर्थ आहे तरी काय,त्यासाठीचा रोडमॅप कसा आहे, माहिती आहे? सध्या काय स्थिती आहे, आकड्यांचा दावा तरी काय?
SBI चा दावा काय
भारतीय अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षांत आगेकूच करेल. आर्थिक वृद्धी दर 7 टक्के होईल. भारत जगात तिसऱ्या स्थानी राहिल. GDP च्या वृद्धीनुसार, भारत 2047 मध्ये स्वातंत्र्याचा 100 व्या वर्षात असेल. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचेल, असा दावा करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचा वाटा मोठा
अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्था झपाट्याने कात टाकत आहेत. एसबीआयच्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशाचे सकल राज्याचं देशांतर्गत उत्पादन पुढील तीन वर्षांत 2027 पर्यंत 500 अब्ज डॉलर होईल. तर महाराष्ट्राचा जीडीपी 647 अब्ज डॉलर इतकी होईल.
तिसरी अर्थव्यवस्था
SBI रिसर्चच्या इकोरॅप रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 6.5 टक्के जीडीपी वृद्धी दर आहे. 2014 नंतर भारताची आगेकूच सुरु आहे. या आकड्या आधारे 2027 मध्ये भारत तिसरी अर्थव्यवस्था होईल. आर्थिक वृद्धी दर 7 टक्के होईल. भारतीय अर्थव्यवस्था 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचेल, असा दावा करण्यात येत आहे.
10 व्या स्थानावरुन उंच उडी
वर्ष 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी आगेकूच केली. अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानवर आली. इंग्लंडला भारताने मागे सारले. 2027 ते 2029 या काळात भारत तिसरी अर्थव्यवस्था होईल, असे भाकीत वर्तविण्यात येत आहे.
अर्थव्यवस्था वाढली
भारताच्या इकोनॉमिक साईजमध्ये वाढ दिसून येते. एसबीआयच्या रिपोर्टनुसार, देशाची अर्थव्यवस्था आता 1,800 अब्ज डॉलर म्हणजे 1.8 ट्रिलियन डॉलरवर पोहचली आहे. अनेक देशांपेक्षा भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे.
जागतिक स्तरावर हिस्सा
2014 मध्ये जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा वाटा 2.6 टक्के होता. त्यात वाढ झाली. सध्या हा हिस्सा 3.5 टक्के आहे. एसबीआयच्या रिपोर्टनुसार, दर दोन वर्षांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 750 अब्ज डॉलरने वाढत आहे.