नवी दिल्ली : भारताचा सोनेरी माणूस (Goldman) तुम्हाला माहिती आहे का? काही किलो सोन्याच्या साखळ्या घालणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील. पण हा माणूस जगभरात सोने निर्यात करतो. त्यांचा साधेपणा तुमच्या मनाला भावल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सोने व्यवसायात नशीब आजमविण्यासाठी 10,000 रुपयांचे कर्ज काढले होते. आज त्यांच्या कंपनीची नेटवर्थ, एकूण भांडवल अडीच लाख कोटी रुपये आहे. ते भारतातील मोठे सोन्याचे व्यापारी (Gold Businessman) आहे. कधी काळी प्रत्येक सराफाकडे जाऊन ते सोने विक्री करत होते. त्यांना नवनवीन सोन्याचे दागिने विक्री करत होते. आज जगभरात ते सोने विक्री करतात. कोण आहे हा सोनेरी माणूस? कसा होता त्यांचा हा सुवर्णमयी प्रवास..
अवघ्या 10 हजारांवर व्यवसाय
सोन्याचे व्यापारी राजेश मेहता यांचा हा सुवर्णमयी प्रवास खरंच सोप्पा नव्हता. 1982 मध्ये त्यांनी या व्यवसायात नशीब आजमाविण्याचे ठरवले. त्यांनी भावाकडून 2000 रुपये आणि बँकेकडून 8000 रुपयांचे कर्ज घेतले. त्यांचा निश्चिय पक्का होता. अनेक अडचणी आल्या. कष्ट करावे लागले. पण ते मागे हटले नाहीत.
कर्नाटकमधून सुरु झाला प्रवास
मेहता कुटुंबिय मुळचे गुजरात राज्यातील. राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता हे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायात होते. त्यांनी कर्नाटक राज्य गाठले. याठिकाणी व्यवसाय सुरु केला. 16 व्या वर्षी राजेश त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात आले. आज ते जगातील सोने निर्यातक म्हणून ओळखल्या जातात. राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीचे ते मालक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत.
डॉक्टर होण्याचे स्वप्न
राजेश मेहता, बेंगळुरु येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. पण नंतर त्यांनी वडिलांच्या ज्वेलरी दुकानात लक्ष घातले. त्यांचा भाऊ प्रशांत आणि त्यांनी वडिलांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा निश्चय केला. राजेश मेहता यांनी चांदीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी भाऊ बिपिन यांच्याकडून 10000 रुपये कर्ज घेतले. राजेश चेन्नई येथून सोने-चांदीचे दागिने खरेदी करुन ते राजकोट येथे विक्री करत होते. त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये पण व्यवसाय वाढवला.
चांदीने सुरुवात, झाले सोने व्यापारी
सुरुवातीला व्यवसायात जम बसू लागताच त्यांनी चांदी सोबतच सोन्याचा व्यापार सुरु केला. त्यांनी बेंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद येथे कारभार वाढवला. 1989 मध्ये त्यांनी सोन्याचे दागिने विक्री सुरु केली. बेंगळुरुतील एका गॅरेजमध्ये त्यांनी सोन्याची दागिने तयार करण्याची पेढी सुरु केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
1200 कोटींची उलाढाल
त्यांनी ब्रिटेन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशात सोने विक्री सुरु केली. 1992 पर्यंत त्यांनी या व्यवसायात आघाडी घेतली. वार्षिक 2 कोटींची उलाढाल सुरु झाली. वर्ष 1998 पर्यंत त्यांच्या व्यवसायाने चांगलीच गती पकडली. वार्षिक 1200 कोटींची उलाढाल त्यांनी केली. त्यांनी शुभ ज्वेलर्स या नावाने सोने-चांदीचे भव्यदिव्य दुकान सुरु केले. आज कर्नाटकात अनेक ठिकाणी त्यांची ज्वेलरी शॉप आहे.
रिफायनरीच खरेदी केली
कंपनीने जुलै 2015 मध्ये स्वीस रिफायनरी Valcambi चे अधिग्रहण केले. आज राजेश मेहता यांच्याकडे स्वित्झर्लंड आणि आणि भारत असा रिफायनरीज आहेत. त्यांची ही कंपनी जगातील सर्वात मोठी सोने निर्यात करणारी कंपनी आहे. 2021 मध्ये या कंपनीची उलाढाल 2.58 लाख कोटी रुपये होती. ही कंपनी भारत, स्वित्झर्लंड आणि दुबईतून सोन्याची निर्यात करते.