भारतीय शेअर बाजाराने आज धमाकेदार सुरुवात केली. बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअरनी उसळी घेतली. त्यामुळे बाजाराला नवीन उच्चांक गाठता आला. अखेरच्या सत्रात बाजाराने धमाकेदार बॅटिंग केल्याने गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. बँक निफ्टीने पण जोरदार किल्ला लढवला. निफ्टीने नवीन ऑलटाईम हाय लेव्हल गाठली. या उच्चांकी कामगिरीसह निफ्टी 22,787.70 वर पोहचला. तर सेन्सेक्सने पण दमदार कामगिरी केली.
कशी झाली सुरुवात
NSE Nifty आज जवळपास 23,000 अंकांच्या घरात पोहचला. आज निफ्टीने नवीन ऐतिहासिक कामगिरी केली. निफ्टीने 22,787.70 अंकाचा नवीन रेकॉर्ड नावावर केला. दुसरीकडे BSE Sensex 406.71 अंक वा 0.55 टक्क्यांच्या उसळीसह 75,017 अंकावर उघडला. याशिवाय एनएसई निफ्टी 118.15 अंक वा 0.52 टक्क्यांच्या तेजीसह 22,766 अंकावर व्यापार करत होता. ताज्या आकडेवारीनुसार, 10:56 वाजता बीएसई सेन्सेक्स 205 अंकांनी घसरुन 74,404 अंकावर व्यापार करत होता. तर एनएसई निफ्टी यावेळी 27.45 अंकांन घसरुन 22,617.85 अंकावर व्यापार करत होता.
निफ्टीने केली कमाल
सकाळच्या सत्रात निफ्टीने कमाल केली. शेअरमध्ये जोरदार उसळी दिसली. निफ्टीच्या 50 मधील 42 शेअरने जोरदार घौडदौड केली. निफ्टीच्या केवळ 8 शेअरमध्ये घसरण दिसून आली. आरबीआयने बंदी मागे घेतल्यानंतर बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 6 टक्के उसळी दिसली. हा शेअर ओपनिंगलाच 410 रुपयांपेक्षा अधिक वाढीसह व्यापार करत होता. बजाज फिनसर्व्ह पण जोरदार उसळीसह ट्रेड करत आहे. हा शेअर 4.50 टक्क्यांनी वधारला. ONGC, NTPC, Shriram Finance या शेअरमध्ये पण तेजीचे वारे होते.
बीएसई मार्केट कॅप 410 लाख कोटींपेक्षा अधिक
बीएसई मार्केट कॅप 410 लाख कोटीपेक्षा अधिक झाले. ते 410.62 लाख कोटी रुपयांवर पोहचले. बीएसईवर 3020 शेअरमध्ये ट्रेड होत आहे. त्यामधील 1991 शेअरमध्ये सुरुवातीच्या सत्रातच उसळी दिसली. तर 897 शेअरमध्ये घसरण दिसली. 132 शेअरमध्ये बदल दिसला नाही. 110 शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले. तर 36 शेअरमध्ये लोअर सर्किट लागले होते.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.