नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) तेजीचे सत्र परतले आहे. मध्यंतरी ढेपाळलेली पारी जोरदार कामगिरीने शेअर बाजाराने भरुन काढली. गेला आठवडा तर शेअर बाजारासाठी शानदार राहिला. उच्चांकसोबतच अनेक कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली. बाजार अनेकदा हिंदोळ्यावर होता. मोठी लाट दिसली नसली तरी बाजाराने चमकदार कामगिरी केली. दोन प्रमुख निर्देशांक बीएसई निर्देशांक (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) यांनी उच्चांक गाठला. त्यामुळे सोमवारी 19 जून पासून पुढील आठवड्यात बाजार कोणती झेप घेतो, हे समोर येईल. गुंतवणूकदारांचा उत्साह सध्या शिगेवर आहे. पुढील आठवड्यात त्यांचे नशीब पालटू शकते.
सेन्सेक्सने तयार केला नवीन रेकॉर्ड
पुढील आठवड्याकडे बघताना गेल्या आठवड्यातील कामगिरीवर नजर टाकणे आवश्यक आहे. शुक्रवारी बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर (Share Market Lifetime High) बंद झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सक्स 758.95 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी वधारला. तर शुक्रवारी सेन्सेक्स 466.95 अंकांनी म्हणजे 0.74 टक्क्यांनी वधारला. 63,384.58 अंकावर चढून बीएसईने इतिहास रचला.
निफ्टीने केला पराक्रम
यापूर्वी 1 डिसेंबर 2022 रोजी निर्देशांक 63,284.19 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 137.90 अंकांनी म्हणजे 0.74 टक्के चढून 18,826 अंकावर पोहचून नवीन रेकॉर्ड केला. निफ्टीचा गेला रेकॉर्ड 18,812.50 अंक होता.
पुढील आठवड्यात असा बदल
पुढील आठवड्यात बाजाराचा मूड काय असेल, याचा अंदाज गुंतवणूकदार लावत आहेत. शेअर बाजारावर जागतिक बाजार, परदेशी गुंतवणूकदारांचा मूड, पावसाचा अंदाज याचा परिणाम होईल. गुंतवणूकदार डॉलरच्या तुलनेत रुपयाची कामगिरी आणि कच्चा तेलाचे भाव यावरही लक्ष ठेऊन आहेत. पावसाची चाल काय असेल, यावर पण बाजार प्रतिक्रिया देईल. नवीन उच्चांक गाठताना बाजारात नफेखोरांमुळे बाजाराची दिशा पूर्णपणे पालटते. बाजारात विक्रीच्या सत्राची भीती असते.
1000 हून 63 हजारांवर
1990 मध्ये पहिल्यांदा S&P BSE SENSEX 1000 अंकावर होता. तो आज 63,244 अंकावर आहे. म्हणजे या 33 वर्षोंमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये 60 पटींची उसळी घेतली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) हा भारताचा प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहे. 1990 मध्ये त्याची स्थापना झाली.
MRF ने रचला इतिहास