वर्ष 2024 मध्ये केवळ शेअर बाजारानेच नाही तर सराफा बाजाराने पण इतिहास रचला आहे. दररोज नवनवीन रेकॉर्ड इतिहास जमा होत आहेत. तर नवीन विक्रम नावावर नोंदविण्याचे सत्र सुरु आहे. शेअर बाजार तेजीत असला की सोने आणि चांदीत पडझड होते, असा एक समज आहे. पण यंदा शेअर बाजारासोबतच सोने आणि चांदीने चौकर आणि षटकार ठोकले आहेत. मौल्यवान धातूंनी रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली आहे. या शर्यतीत सोने आणि चांदीने सेन्सेक्स आणि चांदीला पण धोबीपछाड दिली आहे. गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे.
असा दिला जोरदार परतावा
साल दर साल आधारावर परतावा पाहिला असता, यावर्षी सोन्याने गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांचा परतावा दिल्याचे स्पष्ट होते. तर चांदीने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 8 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही दिवसांत मोठा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने 75,000 टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक NSE Nifty ने 4.65 टक्के तर BSE Sensex ने 3.83 टक्क्यांचा परतावा दिला आहे. बँक निफ्टी इंडेक्सने या वर्षात जवळपास 1.56 टक्क्यांची उसळी घेतली आहे. साल दर साल या आधारावर सोने आणि चांदीने शेअर बाजाराला मागे टाकल्याचे स्पष्ट होते.
या तेजीचे कारण तरी काय
सोने का चमकत आहे
पेस 360 चे सहसंस्थापक अमित गोयल यांच्या मते, भारतीय शेअर बाजाराने गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून पूर्ण मौसमात आहे. त्याची घौडदौड कायम आहे. मार्च ते डिसेंबर 2023 या काळात सोने आणि चांदी पूर्णपणे बाजूला होते. पण आता या धातूंनी मोठी झेप घेतली आहे. त्यामुळेच ते सेन्सेक्सपेक्षा जोरदार कामगिरी बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.