परदेशात आपले एखादे घर असावे अशी अनेक भारतीय लोकांची इच्छा असते, त्यामुळे दुसऱ्या देशात भारतीय लोक मालमत्ता विकत घेत असतात. भारतात प्रॉपर्टीचे दर आकाशाला भिडलेले आहेत. भारतातील टॉप पाच शहरातील जमीनीचे भाव पाहीले तर आपल्या धक्का बसू शकतो इतके जमीनीचे दर जास्त आहेत. तरीही भारतीय लोक केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी विकत घेत सुटले आहेत.चला तर ते देश पाहूयात जेथे भारतीय लोक सर्वाधिक मालमत्ता विकत घेत आहेत….
मनी कंट्रोलच्या बातमीनुसार जगातील टॉप – ५ देश ज्या देशात भारतीय लोक सर्वाधिक प्रॉपर्टी घेत आहेत. त्यात पहिल्या क्रमांक ग्रीसचा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तुर्की आहे. या देशातील मालमत्तांमध्ये भारतीय जास्त गुंतवणूक करीत आहेत. तुर्की देशातील ९९ टक्के नागरिक मुस्लीम धर्मिय आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर कॅरेबियन देश असून तेथेही भारतीय प्रॉपर्टी घेत आहेत. या शिवाय माल्टा आणि स्पेनमध्ये देखील भारतीय स्वत:साठी घरे खरेदी करीत आहेत.
परदेशात घरे विकत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या देशाचा गोल्डन व्हीसा मिळविणे. या शिवाय भारतीय लोकांचे नेहमी एक स्वप्न असते की परदेशातही आपले घर असावे. जर कोणता देश भारतीयांना घर खरेदी करण्याची संधी देत असेल तर भारतीय तेथे गुंतवणूक करतात. ब्रिटन आणि सौदी अरब सारखे देश हे मोठे उदाहरण आहे. या देशा सर्वसामान्य भारतीय तसेच मोठ मोठ्या नामीगिरामी हस्ती घरे खरेदी करीत आहेत.
एखाद्या देशात मालमत्ता विकत घेण्यामागे भारतीय लोकांना त्या देशाचा गोल्डन व्हीसा मिळावा ही इच्छा असते.वास्तविक ग्रीसने साल २०१३ मध्ये गोल्डन व्हीसा योजना सुरु केली होती. त्यानुसार जो कोणी परदेशी व्यक्ती तेथे रियल इस्टेट, सरकारी बॉण्ड या अन्य साधनांपैकी किमान € २५०,००० ( २,२१,७०,२५० रुपये ) गुंतवणूक करेल त्याला ग्रीस सरकार गोल्डन व्हीसा देते. ग्रीस शिवाय संयुक्त अरब अमिराती (UAE),ऑस्ट्रेलिया, अमेरिका ( USA ) सारखे देश थोड्या गुंतवणूकीवर देखील गोल्डन व्हीसा ऑफर करीत आहेत.