नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : सोन्याचं वेड भारतीयांना किती आहे याचे अनेक दाखले देता येतील. भारतातील स्रियाच काय पुरुषही सोन्याचे दागिने घालत असतात. अनेक जण सोन्यात गुंतवणूक करीत असतात. काही अडीअडचण आली तर सोनं तारण ठेवून पैसे उचलतात आणि आपल्यावरील संकट दूर करतात. अशा प्रकारे सोन्याला पूर्वापार भारतात प्रचंड मोठी मागणी आहे. भारतात दरवर्षी 800 टन सोन्याची मागणी होते. परंतू त्या तुलनेत भारतात सोन्याचं उत्पादन नगण्यच होतं असं म्हणाव लागेल.
आता सोन्याचा दर 59 हजार रुपयांपर्यंत गेला असला तरी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 76 वर्षांपूर्वी सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी केवळ 89 रुपये होता. म्हणजे सोन्याच्या किंमतीत तब्बल 661 पट वाढली आहे. तर चांदी 107 रुपये किलोग्रॅम होती आता 70 हजाराच्या पुढे गेली आहे. चीननंतर भारतातच सर्वाधिक सोन्याला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी 800 टन सोन्याची मागणी असली तरी केवळ 1 टन सोन्याचे उत्पादन होते.
सोने हा धातू सर्वसाधारणपणे स्वतंत्र किंवा पारा किंवा चांदी या मिश्र धातूसोबत सापडतो. कॅलेवराईट, सिल्वेनाईट, पेटजाईट आणि क्रेनराईट लोखंडाच्या स्वरुपात सापडले जाते. सर्वाधिक सोने लोखंडासोबत जमिनीच्या खड्ड्यात सापडते किंवा भूमिगत खाणीत सापडते. जमिनीत वरच्या बाजूचे सोने डायनामाईट वापरुन काढले जाते. किंवा खोल खाणीतून खडकाचे तुकडे सुरुंगाद्वारे तोडून शुद्ध करण्यासाठी सोन्याच्या मिलमध्ये पाठवले जाते.
युएस जिओलॉजिकल सर्वेनूसार आतापर्यंत जगभरातील खाणीतून 2 लाख टन सोनं काढण्यात आलं आहे. अजूनही 50 हजार टन सोनं शिल्लक आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानूसार भारतात जमिनीतून 1 एप्रिल 2020 च्या आकडेवारीनूसार 5.86 टन सोन शिल्लक राहीलं आहे.
अमेरिकेला जागतिक महाशक्ती म्हटले जाते. परंतू वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका अहवालानूसार भारतीय घरात 2019 मध्ये 25,000 टनाहून जास्त सोने होते. डीपार्टमेंट ऑफ द ट्रेजरी ब्युरो ऑफ द फिस्कल सर्व्हीसच्या साल 2021 च्या डाटानूसार अमेरिकेच्या सरकारी तिजोरीत 8 हजार टनाहून अधिक सोने आहे. म्हणजेच अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा तीन पट जास्त सोने भारतीयांच्या घरात आहे. भारतीयांच्या विविध देवस्थानांकडे चार हजार टनाहून अधिक सोने आहे.
भारतात कर्नाटकतील कोलार, हट्टी, झारखंडमध्ये परासी गोल्ड माईंस, कुंदर कोचा माइंस, पहाडीया गोल्ड माइंस, चांडील येथे सोन्याच्या खाणी आहेत.