भारताची सर्वात मोठी ट्रॅव्हल्स बॅग बनविणारी लगेज कंपनी व्हीआयपी इंडस्ट्रीज विकली जाणार असल्याची म्हटले जात आहे. या कंपनीला एक मोठी विदेशी कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे. एका मोठ्या ग्लोबल प्रायव्हेट इक्वीटी फर्म एडवेंड इंटरनॅशनल या व्हीआयपी कंपनीला विकत घेण्याची शक्यता आहे. व्हीआयपी कंपनीतील कंट्रोलिंग स्टेक विकत घेण्याची योजना एडवेंड इंटरनॅशनलने आखली आहे. या सौदा व्यापारी जगतात भूकंप आणू शकतो. गुंतवणूकदारांसाठी देखील ही बातमी मोठी आहे.
भारताची सर्वात प्रसिद्ध लगेज कंपनी व्हीआयपी इंडस्ट्रीजमधील कंट्रोलिंग हिस्सेदारी विकत घेण्याची तयारी ग्लोबल प्रायव्हेट इक्वीटी फर्म एडवेंड इंटरनॅशनल केली असून त्या संबंधीच्या व्यवहारावर चर्चा सुरु आहेत. या संदर्भात चर्चा वर्षभरापूर्वी सुरु झाली होती. आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झालेली आहे. व्हीआयपीमधील समभाग खरेदी करण्यात एडवेंट इंटरनॅशनल सर्वात पुढे असून तिने सर्वाधिक बोली लावलेली आहे.परंतू या संदर्भातील चर्चा प्राथमिक पातळीवर सुरु आहेत. त्यास अंतिम स्वरुप येणे अद्याप बाकी आहे.
व्हीआयपी इंडस्ट्रीजचे प्रमोटरचा कंपनीत 51.74% हिस्सेदारी बाळगत आहे. त्यांनी आपला संपूर्ण हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील नियमाकाच्या निर्देशानुसार या पाऊलाने ओपन ऑफर सुरू होऊ शकते, ज्यामुळे इतर भागधारकांना त्यांचे शेअर्स विकण्याची संधी मिळल्याची शक्यता आहे.
मनी कंट्रोलच्या बातमीनुसार सप्टेंबर 2024 च्या तिमाही आकडेवारी नुसार व्हीआयपी इंडस्ट्रीजचा बाजारमूल्य 6,531.91 कोटी रुपये आहे. या आधारे प्रमोटरचा कंपनीतला हिस्सा सुमारे 3,379 कोटी रुपये आहे.
हा सौदा कंपनीच्या सध्या शेअर मुल्य 459.95 रुपये प्रति शेअरच्या ( NSE वर ) 10-15 टक्के अधिक प्रिमियमवर होऊ शकतो. एडवेंट इंटरनॅशनल आणि VIP इंडस्ट्रीजच्या सीईओ नीतू काशीरामका यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. कंपनीचे चेअरमन दिलीप पिरामल हे देखील प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झालेले नसल्याचे म्हटले जात आहे.