नवी दिल्ली : भारताच्या पेमेंट इकोसिस्टमने (Payment Eco System) जगाला भुरळ घातली आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूर येथील PayNow यांच्यात करार झाला. सिंगापूरमध्ये लवकरच भारतातून पैसा पाठवता येईल. तसा तो सिंगापूरमधूनही भारतात पाठविता येईल. पण सिंगापूर पुरतेच युपीआय मर्यादीत नाही. आता जगभरातून युपीआयला मागणी आली आहे. भारताचे युपीआय आता देशापुरते मर्यादीत राहिले नाही, तर ते आता ग्लोबल झाले आहे. त्याला जागतिक झळाळी मिळाली आहे. इतर देशांनाही भारताची ही सक्षम व्यवहार प्रणाली हवी आहे. त्यासाठी भारताकडे मागणी होत आहे. केंद्र सरकारने पेमेंट इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी पाऊलं टाकली आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास यांनी शनिवारी या पेमेंटविषयी मोठा दावा केला. त्यांनी युपीआय ग्लोबल करण्याची वकिली केली. G-20 च्या व्यासपीठाचा भारताला मोठा फायदा होईल. भारताकडे यावेळी यजमान पद आहे. त्यांनी याच व्यासपीठाचा वापर करुन भारतीय ई-पेमेंटची कहाणी जगभर पोहचवण्याची आयाती संधी मिळाल्याचे सांगतिले. तसेच युपीआयचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याची ही नामी संधी असल्याचा दावा केला.
RBI गव्हर्नराचा मोठा दावा
केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरने देणी, फेड पद्धती परिचलन (Payment System Operators-OPS) परिषदेचे त्यांनी नुकतेच उद्धघाटन केले. UPI आणि RuPay नेटवर्कने कमाल केली आहे. या स्वदेशी आर्थिक उत्पादनांचा जागतिकस्तरावर वावर वाढला आहे. त्याचा वापर वाढविण्यावर भर देण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. आरबीआयने पेमेंट्स व्हिजन 2025 हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यातंर्गत ‘प्रत्येकासाठी, सर्वत्र, प्रत्येक वेळी ई-पेमेंट्स’ अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.
जी-20 चा विचार करता, ही सुवर्णसंधी सोडायला नको. त्यामाध्यमातून जगाला भारतीय आर्थिक व्यवहाराचा झंझावात अनुभवता येईल. तसेच त्यांच्या देशात पण ही प्रणाली सुरु करता येईल, यासाठी भारताने संधीचा फायदा उठवायला हवा, असे दास यांना वाटते. भारताने वेगवान पेमेंट प्रणालीतून जे ईप्सित साध्य केले आहे, त्याची कहाणी जगाला दाखविण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
हे युग तंत्रज्ञानाचं
आरबीआय गव्हर्नरने सांगतिले की, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर धडका देत आहे. भारताची युपीआय प्रणाली त्यासाठी महत्वपूर्ण योगदान देऊ शकते. सिंगापूरशी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून जोडण्याचे पाऊल, त्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला. भारत आणि सिंगापूरदरम्यान युपीआय पेमेंट प्रणालीसाठी करार करण्यात आला. त्याचा दोन्ही देशातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सिंगापूर ही जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था आहे. याठिकाणी भारतीय युपीआयच्या माध्यमातून वेगवान आणि सुरक्षित व्यवहाराची चुणूक दिसून येईल.