नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : भारतीय व्हिस्की उत्पादक कंपनी Indri Whisky चा डंका सध्या जगभर गाजत आहे. ही कंपनी अनेक मद्याची इतर ही उत्पादनं तयार करते. पण तिचा सिंगल माल्टेड व्हिस्की ब्रँडने कमाल केली. ही व्हिस्की जगातील सर्वाधिक चविष्ट आणि सर्वांच्या पसंतीत उतरली आहे. या ब्रँडला सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा बहुमान मिळाला आहे. सध्या ही कंपनी भारतासह 17 देशात उत्पादन पोहचवते. लवकरच हा ब्रँड युरोपसह अमेरिकेच्या बाजारात दिसेल. कंपनी विक्रीत आणि गुणवत्तेत झेंड गाडत असताना ही कंपनी शेअर बाजारात (Share Market) पण मागे नाही. या कंपनीने जवळपास 25 वर्षांत गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न दिला. या कंपनीने गुंतवणूकदारांना 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 65 कोटींहून अधिकचा परतावा दिला आहे.
मानाचा तूरा शिरपेचात
Indri Diwali Collector’s Edition 2023 (Indri whisky) ने हा बहुमान पटकावला आहे. हरियाणामधील पिकाडली डिस्टिलरीजचे हे उत्पादन आहे. जगातील सर्वात लोकप्रिय व्हिस्कीचा मान या ब्रँडने कमावला आहे. “Double Gold Best In Show” असा किताब या ब्रँडला मिळाला आहे. आतापर्यंत परदेशी ब्रँडचे कौतुक होत होते, पण आता भारतीय ब्रँडने जगात दबदबा तयार केला आहे. ही वार्ता येताच या कंपनीच्या शेअरला, बाजारात बुधवारी 20 टक्क्यांसह अप्पर सर्किट लागले.
दोन दिवसांत 40 टक्क्यांची तेजी
या कंपनीचे गुंतवणूकदार दोनच दिवसात मालामाल झाले. या दोन दिवसात या शेअरने 40 टक्क्यांची उसळी घेतली. हा स्टॉक 29 सप्टेंबर रोजी 115 रुपयांवर बंद झाला होता. पण या कंपनीचा बहुमान होताच, कंपनीच्या शेअरने जोरदार मुसंडी मारली. शेअरने रॉकेट भरारी घेतली. 3 ऑक्टोबर रोजी हा शेअर 20 टक्के तेजीसह उसळला. तर 4 ऑक्टोबर रोजी या शेअरने मोठी झेप घेतली. हा शेअर 165 रुपयांवर पोहचला.
1 लाखांचे झाले 65 कोटी
Indri Whisky च्या शेअरने जोरदार मुसंडी मारली आहे. 11 जुलै 1997 रोजी हा शेअर केवळ 25 पैशांना होता. तो पुढे जोरदार उसळला. हा शेअर 165 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे 1997 मध्ये या शेअरमध्ये एखाद्याने एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य 65.20 कोटी रुपये झाली असती. या कालावधीत या शेअरने 65100 टक्के परतावा दिला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.