World Best Whisky : Indri whisky या देशी ब्रँडची कमाल, जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा किताब

| Updated on: Oct 03, 2023 | 9:45 AM

World Best Whisky : मधुशालेत रमणाऱ्या, न रमणाऱ्या तमाम चाहत्यांना आनंदीत करणारी बातमी आहे. जगात सर्वच क्षेत्रात भारताचा डंका वाजत आहे. त्यात आता भारतीय मद्याने पण बाजी मारली आहे. या व्हिस्कीने दर्दी रसिकांना रिझवले, त्यांच्यासाठी ही आनंदवार्ता आली आहे. Indri whisky या देशी ब्रँडने सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा बहुमान मिळवला आहे. कुठे तयार होतो हा ब्रँड?

World Best Whisky : Indri whisky या देशी ब्रँडची कमाल, जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा किताब
Follow us on

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : मद्य रसिकच नाही तर सर्वांनाची ही बातमी थक्क करणारी आहे. आतापर्यंत परदेशी मद्याची वाहवा देशात होत होती. परदेशातील काही ब्रँडचं नाव घेण्याची देर की अनेक मद्य रसिक तिचा इतिहास, तयार करण्याची विधी, 100 वर्षे जुन्या मालाची किंमत किती आदी मुखोद्गत माहिती एका झटक्यात देतात. पण या भारतीय ब्रँडने व्हिस्की (World Best Whisky) प्रेमींचा गळा खास बातमीनेच ओला केला आहे. तर Indri whisky या देशी ब्रँडने जागतिक ब्रँडमध्ये पहिला बहुमान मिळवलाय. जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की म्हणून Indri whisky ला किताब मिळाला आहे. सर्वच क्षेत्रात डंका होत असताना या पण क्षेत्रात भारतीय ब्रँड समोर येत आहे, हे पण नसे थोडके!

जगातील व्हिस्कीत नंबर वन

Indri Diwali Collector’s Edition 2023 (Indri whisky) या खास व्हिस्कीने जागतिक पातळीवर अनेक ब्रँडला मागे सारत हा बहुमान पटकावला आहे. जागतिक बाजारात आतापर्यंत परदेशी ब्रँडचाच दबदबा होता. भारतात ही अनेक जण परदेशी ब्रँडचीच चर्चा करतात. त्यांच्या गुणवत्तेची चर्चा अनेक बारमध्ये झडते. पण आता या भारतीय ब्रँडने अनेकांची बोलती बंद केली आहे. सर्वोत अधिक चव चाखलेल्या म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरलेल्या या ब्रँडने जगातील भल्याभल्या ब्रँडला आरसा दाखवला आहे. “Double Gold Best In Show” असा किताब या ब्रँडला मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

इंद्री व्हिस्की आहे तरी काय

तर Indri whisky हा ब्रँड भारतातील हरियाणामधील पिकाडली डिस्टिलरीजचे उत्पादन ( Piccadilly Distilleries in Haryana) आहे. ही सिंगल माल्ट व्हिस्की आहे. माल्टेड बार्लीला धुरी देऊन, धूर देऊन ती तयार करण्यात येते. तिची चव धुरकट असल्याचा दावा करण्यात येतो. अर्थात त्यामुळे तिची वेगळी चव जगभरातील चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली आहे.

इतके आहेत प्रकार

इंद्री व्हिस्की तयार करण्याची खास विधी आहे. त्यामुळे तिची गुणवत्ता आणि चव अविट आणि जीभेवर रेंगाळणारी असल्याचा दावा करण्यात येतो. पारंपारिक भारतीय पद्धतीने तांब्याच्या पात्रात विधीवत ती तयार करण्यात येते. इंद्री व्हिसीचे काही प्रकारात मिळते. इंद्री व्हिस्की स्मोक, कँडीड सुकामेवा, टोस्टेड नट्स, सबटल स्पाईसेस, ओक आणि कडूगोड चॉकलेट फ्लेव्हरमध्ये ती विक्री करण्यात येते.

युरोपमध्ये पोहचणार ब्रँड

हा भारतीय ब्रँड लवकरच जगात पोहचणार आहे. या ब्रँडने किताब पटकावल्याने परदेशातहीत त्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेसह युरोपियन देशात हा ब्रँड या वर्षी नोव्हेंबरपर्यंत दाखल होईल. तर सध्या हा ब्रँड भारतासह एकूण 17 देशात हा ब्रँड पोहचेल.