सर्वसामान्यच नाही तर अब्जाधीशांच्या डोक्याला पण महागाईचा ताप; मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची संपत्ती घटली

| Updated on: Nov 14, 2024 | 11:35 AM

Mukesh Ambani and Gautam Adani Wealth : महागाईने सर्वसामान्याच मेटाकुटीला आला असे नाही तर आता महागाईच्या आकड्यांनी देशातील अब्जाधीशांची सुद्धा झोप उडवल्याचे समोर येत आहे. बुधवारी शेअर बाजारात घसरणीचे एक मुख्य कारण श्रीमंतांच्या संपत्तीत आलेली घट हे सुद्धा होते. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

सर्वसामान्यच नाही तर अब्जाधीशांच्या डोक्याला पण महागाईचा ताप; मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची संपत्ती घटली
मुकेश अंबानी, गौतम अदानींच्या संपत्तीत घट
Follow us on

महागाईने केवळ सर्वसामान्यांचीच झोप उडवली नाही तर श्रीमंतांचे पण टेन्शन वाढवले आहे. महागाईचा परिणाम शेअर बाजारावर पण दिसून आला. गेल्या दोन दिवसातील आकड्यांनी हे स्पष्ट केले आहे. बुधवारी शेअर बाजारात एक टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. तर देशातील बड्या कंपन्यांच्या शेअर पण खाली आले. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.60 टक्क्यांहून अधिकने घसरला. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. मुकेश अंबानी यांची नेटवर्थ जवळपास 2 अब्ज डॉलरने घसरली तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत जवळपास अडीच अब्ज डॉलरची घसरण दिसली.  देशातील किरकोळ महागाई दर आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वर गेला आहे. हा दर 6.21 टक्क्यांवर पोहचला आहे. महागाई दर 4 टक्के निश्चित झाल्यावर केंद्रीय बँक व्याज दर कपातीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कर्जाचा हप्ता कमी होणार नाही.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घसरण

Bloomberg Billionaire Index नुसार, आशियातील सर्वात श्रीमंत व्यापारी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास 2 अब्ज डॉलरची घसरण आली आहे. अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये 1.84 अब्ज डॉलर ची घसरण दिसली. त्यांची एकूण संपत्ती आता 94.4 अब्ज डॉलर इतकी आहे. या वर्षात त्यांच्या संपत्तीत 1.94 अब्ज डॉलरची घसरण दिसली. सध्या मुकेश अंबानी जगातील 17 वे श्रीमंत उद्योगपती आहेत.

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी यांची संपत्ती घटली

तर आशियातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण पाहायला मिळाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्समधील आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 2.46 अब्ज डॉलरची घसरण दिसली. त्यांची संपत्ती 86.8 अब्ज डॉलरवर आली आहे. या वर्षात अदानी यांच्या एकूण संपत्तीत 2.53 अब्ज डॉलरची भर पडली आहे. ते जगातील 18 वे श्रीमंत व्यापारी ठरले आहेत. गेल्या दोन दिवसांत अदानी यांच्या संपत्तीत जवळपास 4 अब्ज डॉलरची घसरण दिसली आहे. एका आठवड्यात अदानी यांच्या संपत्तीत जवळपास 10 अब्ज डॉलरची घसरण दिसली.