नवी दिल्ली : कोरोना महामारीत आधीच रोजगाराच्या चिंतेने त्रस्त केले आहे. त्यात आता वाढती महागाई पुरती हैराण करून सोडणार आहे. आज राजधानी दिल्लीच्या तेल बाजारात सोयाबीन तेलबिया तसेच कपाशी, क्रूड पाम ऑइल (सीपीओ) आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत वाढ झाली. शिकागो एक्सचेंजमधील दोन टक्क्यांची सुधारणाही यामागील कारण आहे. पुढील 10 -15 दिवसांत मोहरीच्या दाण्याची मागणी वाढून याच्या किमतीतही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मंडईमध्ये भुईमुगाच्या उन्हाळी पिकांची आवक वाढल्याने शेंगदाण्याचे तेल आणि तेलबिया यांचे दर तोट्यासह बंद झाले. स्थानिक स्तरावर डीओसीला जास्त मागणी असल्याने आणि शिकागो एक्सचेंजमध्ये वाढ झाल्यामुळे सोयाबीन तेलबियाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (Inflation will take away the taste in your mouth; Edible oil became more expensive; Mustard prices will also go up)
शिकागो एक्सचेंजवर किंमतीत दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. दुसरीकडे, मलेशिया एक्सचेंजमध्ये अर्ध्या टक्क्यांनी घसरण झाली असूनही सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमतींमध्येही सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, राजस्थानातील आग्रा, सलोनी आणि कोटामध्ये मोहरीचा भाव 7,450 रुपये क्विंटलवरून 7,500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. पावसाळ्यात पुढील 10-15 दिवसांत मोहरीची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये हेफेड आणि नाफेड या सहकारी संस्थांकडून दररोज दोन ते अडीच लाख बॅग मोहरीची विक्री केली जात होती, पण यावेळी त्यांच्याकडे नगण्य वस्तू आहेत. गेल्या वर्षी मोहरीमध्ये ब्लेंडिंगला परवानगी होती. परंतु यंदा एफएसएसएआयने 8 जूनपासून मोहरीमध्ये कोणतेही तेल मिसळण्यास बंदी घातली आहे. तसेच जेथे मोहरीचे तेल मिसळल्याच्या तक्रारी येत आहेत, तेथे संबंधितांवर कारवाई केली जात आहे.
मलेशिया एक्सचेंजमध्ये अर्ध्या टक्क्यांनी घट झाली असली तरीही पामोलिनच्या मागणीमुळे तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली. भुईमुगाच्या उन्हाळी पिकासाठी मंडईत आवक वाढल्याने भुईमूग तेलबियांच्या किंमती कमी झाल्या, तर स्थानिक मागणीमुळे कपाशीच्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोहरी तेलबिया – 7,275 – 7,325 रुपये (42 टक्के कंडिशनचा भाव)
> शेंगदाणे धान्य – 5,445 – 5,590 रुपये.
> शेंगदाणा तेल मिल डिलिव्हरी (गुजरात) – 13,350 रुपये.
> शेंगदाणा सॉल्व्हेंट रिफाईंड तेल – 2,055 – 2,185 रुपये. (प्रति टिन )
> मोहरीचे तेल दादरी – 14,250 रुपये प्रति क्विंटल.
> मोहरी पक्की घाणी – 2,300 -2,350 रुपये. (प्रति टिन )
> मोहरी कच्ची घाणी – 2,400 – 2,500 (प्रति टिन )
> तीळ तेल गिरणी डिलिव्हरी – 15,000 – 17,500 रुपये.
> सोयाबीन ऑइल मिल, दिल्ली डिलीव्हरी- 13,450 रुपये.
> सोयाबीन मिल, इंदौर डिलीव्हरी – 13,320 रुपये.
> सोयाबीन ऑईल डेगम, कांडला – 12,220 रुपये.
> सीपीओ एक्स-कांडला – 10,480 रुपये.
> कापूस बियाणे गिरणी, हरियाणा डिलिव्हरी – 13,000 रुपये.
> पामोलिन आरबीडी, दिल्ली – 12,200 रुपये.
> पामोलिन एक्स-कांडला- 11,100 रुपये (जीएसटीशिवाय)
> सोयाबीन धान्य – 7,470 – 7,520,
> सोयाबीन लूज- 7,370 – 7,420
> मका खल- 3,800 रुपये (Inflation will take away the taste in your mouth; Edible oil became more expensive; Mustard prices will also go up)
ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना अटक होईल : अॅड. जयश्री पाटीलhttps://t.co/47wzRix93c#AnilDeshmukh #ED #Maharashtra #ADVJayashreePatil #Crime #MumbaiCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
इतर बातम्या
ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना अटक होईल : अॅड. जयश्री पाटील
सांगलीसह 5 गावाची डोकेदुखी वाढली, महापूर नाही, तर ‘या’ कारणाने धोका वाढला