नवी दिल्ली | 8 March 2024 : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys) उभी करण्यात सुधा मूर्ती यांची मोलाची साथ आहे, हे अनेकांना माहिती नाही. इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. त्यासोबतच त्यांची एक मोठी ओळख आहे. त्या नामवंत लेखिका आहेत आणि सामाजिक कार्यातही त्या आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी आता राजकीय जगतात उडी घेतली. शुक्रवारी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचे नाव नामनिर्देशीत केले. त्यांनी दिलेल्या 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे इन्फोसिस उभी ठाकली. जगात उंच भरारी घेऊ शकली.
चार दशकांपूर्वी सुरुवात
- जवळपास चार दशकांपूर्वी या यश कथेची पटकथा लिहिल्या गेली. इन्फोसिस अस्तित्वात आली. पाहता पाहता आज ही कंपनी देशाची दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी झाली. 1981 मध्ये सात मित्रांनी मिळून इन्फोसिसची (Infosys Company) स्थापना केली होती. आज या कंपनीने इतिहास रचला आहे. पाटणी कंपनीतून या मित्रांच्या करिअरला सुरुवात झाली होती.
- पाटणी कंम्प्युटर सिस्टमला राम राम ठोकल्यानंतर या सात मित्रांनी आयटी सेवा पुरवठादार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे 10 हजार रुपयांचा निधी होता. एन. आर. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एन. एस. राघवन, एस. गोपालकृष्णन, एस. डी. शिबूलाल, के. दिनेश आणि अशोक अरोरा यांनी या कंपनीची सुरुवात केली.
मूर्ती यांच्या पत्नीने दिले पैसे
- इन्फोसिसचे प्रमुख संस्थापक एन आर. नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी या कंपनीसाठी पैसे उधार दिले होते. सुरुवातीला अत्यंत कमी भांडवल, कमी संसाधनं यांच्या मदतीने ही कंपनी सुरु करण्यात आली होती. हळूहळू या कंपनीने विस्तार केला आणि पुढे इतिहास रचला. पाटणी कंम्युटर पुढे आईगेट कॉर्पोरेशनने खरेदी केली. 2011 मध्ये केपजेमिनीने ही कंपनी खरेदी केली होती.
- कोणताही मोठा अनुभव गाठीशी नसताना इन्फोसिसने अनेकांना पाणी पाजले. यशाची एक एक पायरी ही कंपनी चढली. 31 मार्च, 2022 रोजी या कंपनीचे बाजारातील भागभांडवल 16.3 अब्ज डॉलर, म्हणजे जवळपास 1.32 लाख कोटी रुपये होते. या कंपनीकडे एकूण 3.14 लाख कर्मचारी काम करत आहे. इन्फोसिसने गेल्या चार दशकात मोठी झेप घेतली. 1999 मध्ये ही कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंज, Nasdaq वर सूचीबद्ध, लिस्टेड झाली. अशा प्रकारचा इतिहास रचणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
Tata च्या या कंपनीची पहिली महिला इंजिनिअर
सुधा मूर्ती यांचा जन्म उत्तर कर्नाटकातील शिंगाव येथे 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला होता. त्यांचे वडीलांचे नाव आर. एच. कुलकर्णी तर आईचे नाव विमल कुलकर्णी असे होते. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. त्यावेळी अभियंता महाविद्यालयात 150 विद्यार्थ्यांमध्ये त्या एकमेव महिला होत्या आणि शिक्षणानंतर त्या टाटा मोटर्समध्ये पहिल्या महिला अभियंत्या ठरल्या. त्यांनी आतापर्यंत 8 कादंबऱ्या लिहिल्या आहेत.