पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम : बचतीवरील करामध्ये मिळते अधिक सवलत

| Updated on: Feb 14, 2021 | 6:34 PM

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम : बचतीवरील करामध्ये मिळते अधिक सवलत (interest income tax relaxation in post office saving scheme)

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम : बचतीवरील करामध्ये मिळते अधिक सवलत
पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम
Follow us on

नवी दिल्ली : इनकम टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आपल्या फायद्याची ठरु शकते. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एका आर्थिक वर्षात 13500 रुपयांवर कर सवलत मिळते. पोस्ट ऑफिसमधील सेव्हिंग अकाऊंटवर सध्या 4 टक्के व्याजदर मिळते. कमर्शिअल बँक सेव्हिंग अकाऊंटवर हाच व्याजदर 3 ते 3.5 टक्के इतका आहे. म्हणजे बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरत आहे. (interest income tax relaxation in post office saving scheme)

पोस्ट ऑफिसमध्ये खाते कसे उघडायचे?

इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार एक आणि दोन सज्ञान व्यक्ती जॉईंट खाते खोलू शकतात. याशिवाय 10 वर्षावरील मुलांच्या नावेही खाते खोलता येते. तर 10 वर्षाखालील मुलांचे पालकांच्या नावे खाते उघडता येते. या खात्यात कमीत कमी 500 रुपये जमा करावे लागतात, तसेच 50 रुपये खात्यातून काढावे लागतात. खात्यात जमा राशीकरीता कमाल मर्यादा नाही. जर सपूर्ण आर्थिक वर्षात 500 रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यात भरली नाही तर 100 रुपये मेटेनन्स चार्ज कापण्यात येईल. व्याजाचे मूल्यमापन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपासून शेवटच्या दिवसापर्यंत होते. या व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस आता चेक बुक, एटीएम कार्ड, मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग, आधार सीडिंग, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आदि सुविधाही देत आहे.

डिडक्शन कसे होते?

बचत खात्याच्या व्याज उत्पन्नावर इनकम टॅक्स सेक्शन 80TTA नुसार डिडक्शनचा लाभ मिळतो. एका आर्थिक वर्षात 10 हजार रुपयापर्यंत व्याज टॅक्स फ्री आहे. कमर्शिअल बँक सेव्हिंग अकाऊंट, को-ऑपरेटिव्ह बँक सेव्हिंग अकाऊंट आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटच्या माध्यमातून मिळणारे व्याज उतपन्नात मोजले जाते. मुदत ठेवी, आवर्ती ठेवी आणि इतर प्रकारच्या ठेवींवरील व्याज उत्पन्न या अंतर्गत येत नाही. आर्थिक वर्षात 10 हजारांपर्यंतचे व्याज उत्पन्न करमुक्त आहे. जर तुमचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये सामील होईल, ज्यावर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. जर तुमचे व्याज उत्पन्न असेल तर इनकम टॅक्स भरताना हा टॅक्स क्लेम करु शकता. आयटी रिटर्न भरताना इनकम फ्रॉन अदर सोर्सेसमध्ये जाऊन सर्व इनकम माहिती भरुन क्लेम करावे लागते. आयटी रिटर्न करताना तुम्हाला अन्य इनकम सोर्सची माहिती देणे बंधनकारक आहे. तुम्ही डिडक्शनचा लाभ घ्या मात्र आयकर विभागाला तुमच्या अन्य इनकम सोर्सची महिती जरुर असावी.

पोस्ट ऑफिस बचत खात्यात कसे मिळते डबल बेनिफिट?

केंद्र सरकारने 2011मध्ये एक गॅझेट नोटिफिकेशन काढले होते. या नोटिफिकेशननुसार इनकम टॅक्स अॅक्ट 1961मध्ये सेक्शन 10(15)(i)च्या तरतुदीचा समावेश केला गेला होता. या माध्यमातून पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स अकाऊंट्समधून होणारी कमाई कर सूट कॅटेगरीमध्ये अॅड केले. वैयक्तिक खात्यासाठी 3500 रुपये आणि संयुक्त खात्यासाठी 7000 रुपये आहे. सेक्शन 10(15)(i) डिडक्शन नाही, एग्जेप्शन आले आहे. हे तुमचे टॅक्सेबल इनकम कमी करते. या सेक्शनच्या सहाय्याने पोस्ट ऑफिस सेव्हिंग व्याज उत्पन्न कमी केले जाऊ शकते. जर जॉईंट अकाऊंट असेल तर एग्जेप्शनमुळे 7000 आणि 80TTA नुसार 10 हजार असे एकूण 17 हजार रुपये व्याजावर टॅक्समध्ये सूट मिळते. जर तुम्ही एग्जेम्पशनचा फायदा घेत असाल तर रिटर्न फाईल करताना ‘Exempt Income’मध्ये याची माहिती जरुर द्या. (interest income tax relaxation in post office saving scheme)

 

 

इतर बातम्या

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, अवघ्या काही तासांत सॅमसंगचा दमदार स्मार्टफोन युजर्सच्या भेटीला

Hair Care | लिंबासह ‘या’ घटकाचे मिश्रण देईल कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती, नक्की ट्राय करून पाहा!