Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? प्रथमच क्रुड ऑईल 100 डॉलरहूनही खाली घसरले, नागरिकांना मिळणार दिलासा?

| Updated on: Jul 13, 2022 | 12:22 PM

Petrol Diesel Rate News : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले आहे. त्याचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर काय होणार परिणाम, नागरिकांना दिलासा मिळणार का ?

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? प्रथमच क्रुड ऑईल 100 डॉलरहूनही खाली घसरले, नागरिकांना मिळणार दिलासा?
पेट्रोल डिझेल स्वस्त होणार ?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Brent crude settles below : जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड(Brent Crude) मंगळवारी 7 डॉलर घसरून तीन महिन्यांत प्रथमच प्रति बॅरल 100 डॉलरच्या (Dollar) खाली घसरल्या. क्रूडचा मोठा आयातदार चीनने कोविड-19 वर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे आणि तो आयात वाढवण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे जागतिक आर्थिक मंदी (American Recession) येण्याची ही भीती बाजाराला सतावत आहे. त्याचा परिपाक कच्च्या तेलाच्या किंमतींवर(Crude Oil) झाला आहे. एक महिन्यात तेलाच्या किंमतीत सातत्याने कमी जास्त होत आहेत. त्यात चढउतार होत असल्याने त्याचा परिणाम होत आहे. त्यातच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Reserve) महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढीचे (Interest Rate Hike) आक्रमक धोरण रावबिले त्याचा ही परिणाम दिसून आला. डॉलरचे भाव वधरले. तर सोने आणि कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. तसेच जागतिक मंदी वाढण्याचा धोका ही वाढला आहे. या जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी होतील का? याची माहिती घेऊयात.

किंमतीत घसरण

मार्चपासून कच्च्या तेलाचे दर 20 टक्क्यांनी घसरून 100 डॉलरवर आले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. सोबतच विमान प्रवास, पेंट, कपडे आणि सिमेंट अशा प्रमुख 6 क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी महागाईने भरडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

हवाई वाहतूक

हवाई वाहतूक कंपन्यांचा सर्वाधिक 40 टक्के खर्च इंधनावर (ATF) होतो. 2022मध्ये एटीएफ 71 टक्क्यांनी वाढला होता आणि तो 1.23 रुपये प्रतिकिलो/ लीटर झाले. कच्चे तेलाचे दर उतरल्यामुळे एटीएफ स्वस्त होईल.

पेट्रोकेमिकल्स

मॅकेंजी अहवालानुसार, कच्च्या तेलाचे दर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने उताराला लागले आहे. त्यामुले गेल्या तीन महिन्यांत या क्षेत्राचा खर्च 20 टक्क्यांनी घसरला आहे.

पेंट उद्योग

पेंट उद्योगाला याचा सर्वाधिक फायदा होईल. दर घसरणीमुळे पेंटच्या किंमती ही आटोक्यात येतील. पेंट उद्योगात वापरल्या जाणाऱ्या 300 पेक्षा जास्त कच्च्या मालात पेट्रोलियम उत्पादनांचा सर्वाधिक समावेश होतो. आता कच्चे तेल स्वस्त झाल्याचा फायदा या उद्योगास होईल.

टेक्सटाइल

सिंथेटिक टेक्सटाइल उद्योगात वापरले जाणारी फायबर, यार्न आणि फॅब्रिक ही सर्व उत्पादने पेट्रोलियम उद्योगाची उप-उत्पादने (By-products) आहेत. या घडामोडींचा परिणाम होऊन त्याचा थेट किंमतींवर परिणाम होईल.

टायर उद्योग

टायर उद्योगाला (tire industry) याचा फायदा होईल. टायरचे 60 टक्के उत्पादन कच्च्या तेलाशी संबंधित आहे. कच्चे तेल उतरल्यामुळे टायरच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाले तर मागणी वाढून या उद्योगास मोठा लाभ होईल.

सिमेंट

सिमेंट उद्योगातील 60 टक्के व्यवसाय कच्च्या तेलाच्या किमतीशी संबंधित आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे सिमेंट उद्योगास थेट फायदा होईल.

महागाई उतरणीला

ग्राहकोपयोगी प्रत्येक वस्तूंची भाजीपाला आणि डाळीच्या किमती कमी झाल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई घटून 7.1 टक्क्यांवर आली आहे. असे असले तरी अन्नधान्य, फळे, खाद्यांन्न यांच्या किंमती अद्यापही महागाईला चिकटून बसल्या आहेत.