नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात आणि महसूलात जोरदार वृद्धी झाली आहे. कंपनीने शेअर होल्डर्सला बोनस शेअर आणि डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. एनएसईने दिलेल्या माहितीनुसार, तिचा एकत्रित नफा 20 टक्क्यांनी वाढला. आत तो 2488 कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. या घौडदौडीचा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर देण्याचा आणि लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
महसूलात घेतली आघाडी
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एकत्रित महसूलात 34 टक्क्यांची वाढ झाली. महसूलाचा आकाडा 4625 कोटींच्या घरात पोहचला आहे. अर्थात कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध नाही. कंपनी IPO आणण्याच्या तयारीत आहे. एनएसईच्या तिमाही निकालानुसार जानेवारी-मार्च या दरम्यान कॅश मार्केट शेअर 92 टक्क्यांनी वाढला आहे. तर इक्विटी ऑप्शन्स शेअर 94.14 टक्के आहे. एनएसईचा इक्विटी फ्युचर मार्केट शेअर 99.91 टक्के आहे.
गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
निफ्टीने रचना इतिहास
शुक्रवारी निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. या रेकॉर्डमुळे गुंतवणूकदार सकाळच्या सत्रात आनंदाने नाचले. त्यानंतर बाजार आपटला. पण हा रेकॉर्डही लवकरच मोडीत निघेल, असा तज्ज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात बाजाराने मूड बदलल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. निफ्टी 172 अंकांच्या घसरणीसह 22,475.85 अंकावर बंद झाला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.