Bonus Share : गुंतवणूकदारांचा भांगडा, दोन महिन्यात दुसऱ्यांदा बोनस शेअर, 1 शेअरवर एक फ्री, रेकॉर्ड डेट कधी

| Updated on: Aug 18, 2024 | 4:00 PM

Share Market : PVV Infra कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. ही कंपनीने या आठवड्यात एक्स बोनस स्टॉकची घोषणा केली आहे. कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 शेअर बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्याची रेकॉर्ड डेट कधी आहे?

Bonus Share : गुंतवणूकदारांचा भांगडा, दोन महिन्यात दुसऱ्यांदा बोनस शेअर, 1 शेअरवर एक फ्री, रेकॉर्ड डेट कधी
गणपती उत्सव सुरु होत आहे. त्यानंतर अनेक सण एका पाठोपाठ येत आहेत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक सणांची रेलचेल असेल. यामध्ये तुम्हाला कमाईची संधी साधता येईल. ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी फेस्टिव थीमवर स्टॉक बास्केट तयार केली आहे. त्यात हे चार स्टॉक आहेत. कदाचित त्यात तुम्हाला मोठा फायदा होईल.
Follow us on

बोनस शेअरचे वाटप करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज आहे. या आठवड्यात शेअर बाजारात PVV Infra कंपनीचा शेअर एक्स बोनस स्टॉक स्वरुपात ट्रेड करणार आहे. कंपनीने एका शेअरवर एक एक शेअर बोनस देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. या शेअरचा भाव 20 रुपयांपेक्षा कमी आहे. या शेअरने अजूनही डिव्हिडंड दिला नाही. पण बोनस शेअरमुळे हा पेनी शेअर सध्या लोकप्रिय झाला आहे. या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत.

कोणत्या दिवशी रेकॉर्ड डेट?

कंपनीने शेअर बाजाराला 8 जुलै रोजी याविषयीची माहिती दिली. 10 रुपयांच्या फेसवॅल्यूच्या एका शेअरवर एक शेअर बोनस देणार आहे. या बोनस इश्यूसाठी कंपनीने 20 ऑगस्ट 2024 ही एक्स बोनस डेट निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांचे नाव रेकॉर्ड डेट बूकमध्ये असेल, त्यांना बोनस शेअरचा लाभ मिळेल.

हे सुद्धा वाचा

दोन महिन्यात 2 वेळा बोनस शेअर

पीव्हीपी इन्फ्रा लिमिटेड दुसऱ्यांदा बोनस शेअर देत आहे. यावर्षी 21 जून रोजी कंपनीने एक्स बोनस स्टॉक दिला होता. तेव्हा कंपनीने 5 शेअरवर 1 शेअर बोनस दिला होता. बीएसई संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने अजून एकदा पण डिव्हिडेंड दिला नाही.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी

गेल्या काही दिवसात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली. 9 ऑगस्टपासून आतापर्यंत स्टॉकची किंमत 20 टक्क्यांनी वधारली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले होते. त्यानंतर हा स्टॉक बीएसईवर 17.79 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर 60 टक्क्यांहून वाढला आहे. या कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 35.82 रुपये आहे. तर निच्चांकी भाव 10.29 रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.