Akshaya Gold : सोन्याने ग्राहकांना अक्षय परतावा दिला. गेल्या 11 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल झाले. मागील आकडेवारीवर नजर टाकली तर ग्राहकांना मोठा फायदा झाला.
Ad
अक्षय धन
Follow us on
नवी दिल्ली : अक्षय तृतीयेला सोने(Akshaya Tritiya Gold) खरेदी केले तर ते अक्षय असते. म्हणजे हे सोने वृद्धीगंत होते, अशी मान्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकाने अक्षय तृतीयेला सोने खरेदी केले असेल तर त्यांना 19.67 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला 3 मे रोजी अक्षय तृत्तीया होती. यादिवशी सोन्याचा भाव 50,808 रुपये प्रति तोळा होता. अजून मे महिन्या येण्यास 15 दिवसांचा कालावधी बाकी आहे. यंदा 22 एप्रिल रोजी अक्षय तृत्तीया आहे. सोन्याचा भाव यावेळी 61,000 रुपयांच्या घरात आहे. म्हणजे ग्राहकांचा जवळपास 10,000 रुपयांचा फायदा झाला आहे. चांदीने या काळात जवळपास 20 टक्के परतावा दिला आहे. सोन्याने ग्राहकांना अक्षय परतावा (High Return) दिला आहे.
चांदीने केली चांदी
3 मे 2022 रोजी अक्षय तृत्तीयेला चांदीचा भाव 63,049 रुपये किलो होती. आज 14 एप्रिल 2023 रोजी चांदीचा भाव 79,600 रुपये किलो आहे. म्हणजे एक वर्षाच्या आता चांदीने ग्राहकांना एका किलोमागे 16,551 रुपयांचा फायदा मिळवून दिला आहे. ग्राहकांची चांदी झाली आहे. सोन्यापेक्षा चांदीने अधिक परतावा दिला आहे.