नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ, गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण काळ ठरला. या सरकारला आता जवळपास 9 वर्षे पूर्ण (ModiAt9) झाले आहे. या कालावधीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांचा परतावा मिळाला. तर सुवर्णवेड असलेल्यांना त्यांच्या वेडाची बेशकिंमती भेट मिळाली. परंपरागत गुंतवणूकदारांना या कालावधीत सर्वाधिक परतावा मिळाला. त्यांना जोरदार कमाई करता आली. सोन्याने या काळात गुंतवणूकदारांना 120 टक्क्यांचा परतावा (Best Return) दिला. या 9 वर्षांत मोदी सरकारने सुवर्ण धोरणात मोठे बदल केले आहेत. हे बदल गुंतवणूकदार, खरेदीदारांच्या पथ्यावर पडले आहेत.
सुवर्ण धोरण
सुवर्ण धोरणाअंतर्गत, केंद्र सरकार सोने मुद्रीकरण योजना घेऊन आले. तर दुसरीकडे वन नेशन वन गोल्ड प्राईस हे स्वप्न साकारण्यासाठी इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज सुरु केले. परंपरागत गुंतवणूकदारांना फिजिकल गोल्डच्या मोहातून बाहेर काढण्यासाठी सुवर्ण रोखे योजना सुरु केली. त्यावर व्याजासहीत दरवाढीचा लाभ दिला. मे 2014 नंतर सुवर्ण धोरणाचा असा फायदा झाला.
9 वर्षांत 122 टक्के रिटर्न
मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी सोन्याचा भाव 26,863 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तेव्हापासून सोने अगदी सुसाट आहे. सोन्याच्या भाव गगनाला भिडले. सोने दुप्पटीपेक्षा काकणभर वधारले आहेत. काही दिवसांत सोने-चांदी नवीन रेकॉर्ड करतील, असा दावा करण्यात येत आहे. या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. goodreturns च्या आकडेवारीनुसार, 30 मे रोजी, सकाळच्या सत्रात सोन्यात प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांची घसरण झाली. मंगळवारी 22 कॅरेटचा भाव 55,650 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजे या काळात सोन्याने 122 टक्क्यांचा परतावा दिला आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याने जवळपास 32,737 रुपयांचा परतावा दिला आहे.
हे निर्णय ठरले महत्वाचे