Maharatna Company : पैशांचा पडेल पाऊस! या महारत्न कंपनीत करा गुंतवणूक

| Updated on: Feb 09, 2023 | 5:33 PM

Maharatna Company : या महारत्न कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीने शेअर धारकांना नियमीतपणे लाभांश देत आहे. या कंपनीने 2000 पासून आतापर्यंत चार वेळा बोनस शेअर दिले आहेत. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी या सरकारी कंपनीत एक लाखांची गुंतवणूक केली, त्याचे मूल्य आज 2 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

Maharatna Company : पैशांचा पडेल पाऊस! या महारत्न कंपनीत करा गुंतवणूक
गुंतवणूकदार मालामाल
Follow us on

नवी दिल्ली : दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बरेच फायदे मिळतात. अनेक लाभ त्यांच्या पदरात पडतात. शेअरची किंमत वाढते, लाभांश, बोनस असा फायदाही मिळतो. शेअर बायबॅक, राईट्स इश्यू असे अनेक फायदे सहज मिळतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार अल्पकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अधिक फायद्यात राहतात. त्यांना मिळणारा रिवॉर्ड तर कित्येक पटीत फायदेशीर ठरतो. ज्यांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरच्या किंमतींचा (BPCL Share Price) आढावा घेणे आवश्यक आहे. हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. त्याने जोरदार परतावा (Multibagger Return) दिला आहे.

महारत्न कंपनीने शेअरधारकांना नियमीतपणे लाभांश दिला आहे. या कंपनीने 2000 पासून आतापर्यंत चार वेळा बोनस शेअर दिले आहेत. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी या सरकारी कंपनीत एक लाखांची गुंतवणूक केली, त्याचे मूल्य आज 2 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

बीएसईच्या (BSE) माहितीनुसार, बीपीसीएलने वर्ष 2000, 2012, 2016 आणि 2017 मध्ये बोनस शेअरची घोषणा केली आहे. 20 डिसेंबर 2000 रोजी बीपीसीएलने गुंतवणूकदारांना 1:1 प्रमाणानुसार बोनस शेअर जाहीर केला होता. तर 13 जुलै 2012 आणि 13 जुलै 2016 रोजी 1:1 प्रमाणानुसार बोनस शेअर दिला. 13 जुलै 2017 रोजी 1:2 प्रमाणानुसार बोनस शेअर दिला.

हे सुद्धा वाचा

या महारत्न कंपनीने 1:1 बोनस शेअर दिल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार, ज्याने 2000 मध्ये बीपीसीएल शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. त्याच्या शेअर होल्डिंगमध्ये 8 पट (2 x 2 x 2) वाढ झाली आहे. 2017 मध्ये महारत्न कंपनीने 1:2 बोनस शेअर जाहीर केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांचा फायदा झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांची शेअर होल्डिंग 12 पटीने (8 x 1.5) वाढली.

कंपनीच्या सुरुवातीच्या काळात वर्ष 2000 मध्ये BPCL च्या शेअरची किंमत जवळपास 20 रुपये प्रति शेअर होती. त्यावेळी एखाद्या गुंतवणूकदाराने बीपीसीएलमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 5,000 शेअर मिळाले असते. चार बोनस शेअरमुळे त्याची कमाई 12 पट वाढली असती. 2000, 2012, 2016 आणि 2017 मध्ये बोनस शेअर जाहीर करण्यात आले होते. गुंतवणूकदाराच्या खात्यात एकूण 60,000 शेअर (5,000 x 12) झाले असते.

BPCL च्या शेअरची किंमत आज जवळपास 335 रुपये प्रति शेअर आहे. याचा अर्थ, या 23 वर्षांत एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 2 कोटी रुपयांहून अधिक असते. या 23 वर्षांत गुंतवणूकदारांना 200 पट म्हणजे 19,900 टक्के रिटर्न मिळाला असता.

बीपीसीएल कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यांना इतर कोणत्याही शेअरपेक्षा मोठा परतावा मिळाला आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.