नवी दिल्ली : कच्चा तेलाने (Crude Oil Price) सध्या जागतिक बाजारात उसळी घेतली आहे. बेंच मार्क ब्रेंट क्रूड ऑईल सध्या 76.13 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. तर डब्ल्यूटीआय कच्चा तेलात घसरण आली आहे. 71.29 डॉलर प्रति बॅरलवर या किंमती आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल उत्पादन कंपन्या सध्या फायद्यात असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल पंपावर लागली का स्वस्ताईची पाटी? आज किती झाले कमी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price), जाणून घ्या इंधनाचे दर एका क्लिकवर तुम्हाला एका एसएमएसवर किंमती जाणून घेता येईल.
सकाळीच भाव केले जाहीर
जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले.
अशी भरते सरकारची तिजोरी
एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 18 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.
प्रति लिटर इतका फायदा
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
भाव एका SMS वर
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
दरात कपात
केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.