मुंबई : देशातील सर्वात लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा जागतिक उद्योगविश्वात मोठं नाव आहे. सुईपासून विमानापर्यंत सर्वच व्यवसायात टाटा उद्योग समूह आहे. अशातच रतन टाटा यांना आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी टक्कर देणार आहे. ईशा अंबानी यांचे रिलायन्स ब्रँड्स भारतात अनेक परदेशी रिटेल आणणार आहेत. त्यामध्ये मुकेश अंबानी यांनी रतन टाटा यांच्या स्टारबक्स इंडियाला टक्कर देण्यासाठी ब्रिटीश रेस्टॉरंट चेन ‘प्रीट ए मैंगर’शी करार केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्ससोबत करार केल्यानंतर ब्रिटनची कॉफी आणि सँडविच चेन ‘प्रीट ए मैंगर’ने भारतात आपलं पहिलं स्टोअर उघडलं आहे. भारतात प्रेट ए मैंगरचे पहिले आउटलेट उघडले आहे. नुकतेच मुकेश अंबानी यांनी बेवरेज मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे.
भारतात रिलायन्स ब्रँड्सने 10 प्रीट ए मैंगर रेस्टॉरंट उघडण्यासाठी करार केला आहे. तसंच तरूणाईमध्ये चहा आणि कॉफी शॉप्सच्या लोकप्रियतेमुळे ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स ब्रँड्सने ‘प्रीट ए मैंगर’ स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे ईशा अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल या नवीन उद्योगासह भारतातील खाद्य आणि पेय उद्योगात धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. दरम्यान, मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल उद्योगसूनहाने फास्ट फूड मार्केटमध्ये जोरदार एंट्री घेतली आहे. ‘प्रीट ए मैंगर’चे पहिले स्टोअर BKC मुंबई येथे सुरु करण्यात आले आहेत. यासोबत भारतातील इतर शहरातही लवकरच हे स्टोअर सुरु करण्यात येणार आहे. नुकतेच, मुकेश अंबानी यांनी सुरत येथील प्रसिध्द बेवरेज कंपनी कँपा कोला हा ब्रँड परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.