आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी यांनी एक मोठी योजना आखली आहे. मुकेश अंबानी यांच्या कन्या इशा अंबानी यांनी सहा ग्लोबल फॅशन ब्रॅंडना भारताता आणण्याची तयारी सुरु केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने तसे अनेक ब्रॅंडमध्ये आपले नाव आजमावले आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी शिरकाव केला आहे. भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती 110 अब्ज डॉलर आहे. तर सध्या इशा अंबानी रिलायन्स ग्रुपची कंपनी रिलायंन्स रिटेलचे नेतृत्व करीत आहे.
इशा अंबानी यांनी साल 2022 पासून रिटेल व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर जागतिक ब्रँड भारतात आणण्याचे प्रयत्न इशा अंबानी यांनी तीव्र केले. 8,20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या रिलायन्स रिटेलने गेल्यावर्षी अनेक प्रमुख ब्रँडसोबत करार केले आहेत. बॉस पासून व्हर्सासह इतर अनेक जागतिक ब्रँड भारतात आणण्याची तयारी सुरू झाली आहे.
मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत अनेक जागतिक ब्रँड भारतात आणले आहेत. अशा परिस्थितीत मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी ही आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत सहा जागतिक फॅशन ब्रँड भारतात आणण्याच्या तयारी करीत आहे. व्हर्साचे, अरमानी, बालेनियागा आणि बॉस हे यापैकी काही ब्रँड आहेत. याशिवाय येत्या काही महिन्यांत सहा जागतिक फॅशन ब्रँड येऊ शकतात.
ओल्ड नेव्ही
अरमानी कॅफे
असोस
शीन
ईएल & एन कॅफे
एसएमसीप ग्रुपचा सॅन्ड्रो आणि माजे
या ब्रँडचे कपडे खरेदी करण्यासाठी तुम्ही रिलायन्सचे AJIO ॲप वापरू शकता. तुम्ही ते संबंधित ब्रँडच्या ॲपवर देखील घेऊ शकता. याशिवाय तुम्ही Jio World Plaza वरून यातील काही ब्रँडचे कपडे देखील खरेदी करू शकता. ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलने नुकतेच चार नवीन नेल कलर ब्रँडचे कलेक्शन लाँच केले आहे. यामध्ये जेल वेल, स्विफ्ट ड्राय, ब्रेथ अवे आणि ट्रीट कोट यांचा समावेश होता. नेल कलर सोबत, ब्रँड नो बंप बेस, क्युटी केअर आणि टफेन अप फॉर्म्युलासह नेल केअर देखील बाजारात आणले आहेत.