भारतातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादक कंपनी आयटीसी लिमिटेडने (ITC Ltd) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा मिळवला. कंपनीने जुले ते सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवशी 54 कोटींचा नफा मिळवला. ही कंपनी सिगरेट व्यतिरिक्त बिस्किट, फ्रोझन फूड आणि इतर एफएमसीजी उत्पादनांची विक्री करते. अर्थात सिगरेट उत्पादनातून कंपनीला अधिक नफा होतो. हासोबत, इतर पेयासोबत अनेक जण सिगरेट सेवन करतात. त्याचा कंपनीला मोठा फायदा झाला. केवळ सिगरेटमुळेच या कंपनीला 6.6 टक्के फायदा झाला आहे.
सिगरेटमधून मोठी कमाई
आयटीसी कंपनीला सिगरेट विक्रीतून सर्वाधिक कमाई झाली. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मधील जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीला एकूण निव्वळ नफा 1.8 टक्के वाढला. कंपनीचा नफा 5,054.43 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4,964.52 कोटी रुपयांचा नफा झाला. या कालावधीत आयटीसी कंपनीचा व्यवसाय 6.6 टक्के वाढला आणि तो 8,877.86 कोटींवर आला. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला सिगरेटमधून 8,328.21 कोटी रुपयांची कमाई झाली. सिगरेट सेगमेंटमध्ये आयटीसीकडे देशातील अनेक सर्वाधिक विक्री होणारे ब्रँड आहेत. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार या ब्रँडची विविध सिगरेट खरेदी करतात.
कमाईच्या आकड्यांनी तोडले रेकॉर्ड
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आयटीसी कंपनीचा ऑपरेशनल महसूल 15.62 टक्क्यांनी वाढून 22,281.89 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षातील या तिमाहीत हा महसूली आकडा 19,270.02 कोटी रुपये होता. याच कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 20.92 टक्क्यांनी वाढून 16,056.86 कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत आयटीसीच्या इतर उत्पनासह एकूण महसूल
14.86 टक्क्यांनी वाढला. तो 22,897.85 कोटी रुपये झाला. एका वर्षापूर्वी हा आकडा 19,934.9 कोटी रुपये होता.
या सेगमेंटमध्ये पण कंपनीची कमाल
आयटीसी कंपनी एफएमसीजी, हॉटेल, अगरबत्ती, माचिस पेटी आणि स्टेनशरी सारख्या क्षेत्रात व्यवसाय करते. एफएमसीजी सेगमेंटमध्ये कंपनीचा महसूल 6.1 टक्क्यांनी वाढला, तो 14,463.15 कोटी रुपये आहे. तर यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कमाईचा हा आकडा 13,631.46 कोटी रुपये होता. तर ITC Hotel च्या व्यवसायाचा महसूल 17 टक्के वाढला. तो 789.16 कोटी रुपयांवर पोहचला.
तर अगरबत्ती व्यवसायाच्या माध्यमातून कंपनीची कमाई 46.57 टक्क्यांनी वाढली आणि ती 5,845.25 कोटी रुपये झाली. आयटीसी लिमिटेडचा शेअर गुरूवारी बीएसईवर 471.85 रुपयांवर बंद झाला होता. तर आज सध्या 11:25 मिनिटांना तो 489 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता. आज त्यामध्ये 17.35 अंकांची वाढ दिसली.