रिअल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनमधील पेनी स्टॉक जमश्री रिॲल्टीच्या (Jamshri Realty) स्टॉकने सलग 35 व्या सेशनमध्ये जोरदार घौडदौड केली आहे. कंपनीचा शेअर आज सकाळच्या सत्रात 5.65 टक्क्यांनी उसळून 289.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या 35 व्यापारी सत्रात हा शेअर सातत्याने 2 टक्क्यांहून अधिकचे अप्पर सर्किट लावत आहे. जामश्रीने नुकताच भारतीय बाजारात 100:1 या प्रमाणात एक्स स्प्लिटची घोषणा केलेली आहे.
शेअरची तुफान घौडदौड
जमश्री रिॲल्टीने 30 ऑगस्ट रोजी 2 टक्के अप्पर सर्किटवर 278.75 रुपये प्रति शेअरचा नवीन 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. या कंपनीने केलेला हा 34 वा उच्चांक आहे. आजही कंपनीच्या शेअरने 5 टक्क्यांची आगेकूच केली आहे. खासकरुन BSE वर हा शेअर 12 जुलैपासून सातत्याने 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर आहे. 12 जुलै 2024 ते 2 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत हा शेअर प्रत्येक व्यापारी सत्रात घौडदौड करत असल्याचे दिसून येते. 11 जुलै रोजी हा शेअर 142.25 रुपयांवर होता. त्यानंतर त्याने मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर आज सकाळच्या सत्रात 5.65 टक्क्यांनी उसळून 289.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.
काय आहे माहिती?
16 ऑगस्ट रोजी हा शेअर 100:1 या रेशोत स्प्लिट झाला होता. त्यावेळी हा शेअर 228.75 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. 16-30 ऑगस्ट दरम्यान जमश्री शेअरमध्ये 22 टक्क्यांची तेजी आली होती. 100:1 प्रमाणात हा शेअर स्प्लिट होईल. 1000 रुपयांच्या फेस व्हॅल्यू वर एका शेअरचे मूल्य 10 रुपये असून 100 शेअरमध्ये तो विभाजीत होईल.
5 वर्षांत 10000% अधिकची उसळी
जगातील बेस्ट व्हिस्की इंद्री तयार करणारी कंपनी पिकॅडिली ॲग्रोच्या शेअरमध्ये तुफान तेजीचे सत्र आहे. पिकॅडिली ॲग्रोचा शेअर गेल्या 5 वर्षांत 10400 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. या कंपनीचा शेअर 30 ऑगस्ट 2019 रोजी 7.34 रुपयांवर होता. तर हा शेअर या 29 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर 788.45 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 8300 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.