नवी दिल्ली : मंदीचा (Recession) फेरा पुन्हा अनेक देशांवर येऊ घातला आहे. त्यात गरीबच नाही तर महाशक्तीशाली अमेरिकाही (America) भरडल्या जात आहे. महागाईने सर्वच अर्थव्यवस्था जेरीस आल्या आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठी E-Commerce कंपनी Amazon च्या मालकाने सर्वांसाठी काही सल्ला दिला आहे..
जेफ बेजोस (Jeff Bejos) यांनी मंदीबाबत लोकांना जागरुक राहण्याचा सल्ला दिला आहे. लोकांनी आता खरेदीचा मोह टाळायला हवा. महाग वस्तूंची खरेदी न करण्याचा सल्ला बेजोस यांनी दिला आहे.
सध्या लोकांनी टीव्ही, कार या सारख्या वस्तूंची खरेदी करणे टाळावे. पैशांची बचत करावी. काही पैसा गाठीशी ठेवावा, कारण मंदीचा मोठा कालावधी अजून जाणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याकडे जगातील अर्थतज्ज्ञ गंभीरतेने पाहत आहेत.
अमेरिकेतील CNN या वृत्त वाहिनीशी बोलताना मंदी, तिचे परिणाम आणि उपायासंबंधी त्यांनी माहिती दिली. त्यांचे मते, जगातील मोठ्या कंपन्या सध्या मंदीच्या दबावाखाली आहे.
विशेषतः टेक कंपन्या या मंदीत भरडल्या जात आहेत. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी कंपनीतील अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तर मेटाने 11,000 कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे.
अॅमेझॉनची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. तिच्या मालमत्तेत एकाच वर्षात 40 टक्क्यांची घसरण आली आहे. या दबावात कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यापासून कंपनीने कर्मचारी भरतीला ब्रेक लावला आहे.
जोपर्यंत आर्थिक परिस्थिती सामान्य होत नाही. तोपर्यंत अॅमेझॉन नवीन कर्मचारी भरती करणार नाही. CNN मधील मुलाखतीदरम्यान बेजोस यांनी आर्थिक अनिश्चिततेत कोणतीही कंपनी, व्यक्तीने जोखीम घेण्यापासून वाचले पाहिजे.
अनेक अर्थव्यवस्था आर्थिक मंदीमुळे जेरीस आल्या आहेत. अमेरिका, ब्रिटनमध्ये महागाईने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्याचा परिणाम तिथल्या विकास कामांवर आणि प्रकल्पांवर होत आहे. या देशांच्या अर्थव्यवस्था तिमाहीत घसरणीवर आहेत.