वर्षभरात अंबानी-अदानींपेक्षा दुप्पट कमाई; जेफ बेजोस आणि एलॉन मस्क यांन पण टाकले मागे

| Updated on: May 04, 2024 | 5:34 PM

एआय चिप (AI Chip) तयार करणारी कंपनी एनवीडिया कॉर्प (Nvidia Corp), बाजारातील भांडवलाआधारे जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेनसन हुआंग हे या वर्षात सर्वाधिक कमाई करणारे उद्योजक ठरले आहे. ते जागतिक अब्जाधीशांच्या यादीत सध्या 20 व्या क्रमांकावर आहेत.

वर्षभरात अंबानी-अदानींपेक्षा दुप्पट कमाई; जेफ बेजोस आणि एलॉन मस्क यांन पण टाकले मागे
कमाईच कमाई
Follow us on

एआय चिप (AI Chip) तयार करणारी अमेरिकन कंपनी, एनवीडिया कॉर्प (Nvidia Corp) मार्केट कॅपनुसार जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. जेनसन हुआंग हे या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहे. 1993 मध्ये ही कंपनी हुआंग यांनी सुरु केली होती. ते जगातील सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ॲप्पल नंतर जगात या कंपनीचा बोलबाला आहे. जगभरात एआय तंत्रज्ञान गतीने वाढत आहे. जगभरात सेमीकंडक्टर चिपची मागणी वाढली आहे. परिणामी एनवीडिया कॉर्पचे शेअर सातत्याने तेजीत आहे. ही दोन ट्रिलियन डॉलरचे मार्केट कॅप मिळवणारी जगातील पहिली चिप कंपनी ठरली आहे.

शुक्रवारी शेअरमध्ये पुन्हा तेजी

एनवीडियाच्या शेअरमध्ये शुक्रवारी 3.46 टक्क्यांची तेजी दिसून आली. या घडामोडींमुळे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेनसन हुआंग यांच्या एकूण संपत्तीत 2.58 अब्ज डॉलरची भर पडली. 78.2 अब्ज डॉलरसह ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर आहेत. यावर्षात त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक 34.2 अब्ज डॉलरची तेजी आली आहे. तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग याच्या नेटवर्थमध्ये 32.8 अब्ज डॉलर, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीत 31.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यंदा 14.3 अब्ज डॉलर तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत यंदा 14.2 अब्ज डॉलरची तेजी आली आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीचा दंडावर टॅटू

एनवीडियाची स्थापना जेनसन हुआंग यांनी केली होती. त्यांचा जन्म 1963 मध्ये तैवानमध्ये झाला होता. त्यांचे लहानपण तैवान आणि थायलंडमध्ये गेले. 1973 मध्ये त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अमेरिकेतील त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांना पाठवले. तिथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी Nvidia ही कंपनी एप्रिल 1993 मध्ये सुरु केली. ही कंपनी व्हिडिओ गेम, ग्राफिक्स चिप्स तयार करण्याचे काम करत होती. जेव्हा कंपनी 100 डॉलरच्या घरात पोहचली. तेव्हा जेनसन यांनी त्यांच्या दंडावर कंपनीचा लोगो टॅटू करुन घेतला. त्यांची एनवीडियामध्ये 3.5 टक्के वाटा होता.

तेजीचे सत्र का?

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोठ-मोठ्या कंपन्या एनवीडियाकडून जास्तीत जास्त चिप खरेदी करत आहेत. त्यांच्यात जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. सौदी अरब आणि युएईमध्ये पण कंपनीकडून चिप खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चीनच्या कंपन्या, टेन्सेट आणि अलिबाबा पण एनवीडियाच्या दरवाजावर आहेत. जगात वाढत्या चॅटबॉट आणि एआयच्या प्रचलनाने या कंपनीकडे चिपसाठी कंपन्यांच्या रांगा लागल्या आहेत.