jet fuel prices hike: विमान इंधनाच्या दरात वाढ; प्रवास महागण्याची शक्यता

| Updated on: Apr 17, 2022 | 11:52 AM

जेट फ्यूलच्या (jet fuel) दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. जेट फ्यूलचे दर 0.2 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. गेल्या बारा महिन्यांमध्ये तब्बल आठवेळा जेट फ्यूलचे दर वाढवण्यात आले आहेत.

jet fuel prices hike: विमान इंधनाच्या दरात वाढ; प्रवास महागण्याची शक्यता
विमान इंधनाचे भाव वाढले
Follow us on

नवी दिल्ली : जेट फ्यूलच्या (jet fuel) दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. जेट फ्यूलचे दर 0.2 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. गेल्या बारा महिन्यांमध्ये तब्बल आठवेळा जेट फ्यूलचे दर वाढवण्यात आले आहेत. वर्तमान स्थितीमध्ये जेट फ्यूलचा दर सर्वोच्च दरावर पोहोचला आहे. जागतिक स्थरावर कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात वाढ झाल्याने त्याचा मोठा फटका हा इंधन दरवाढीला बसला आहे. भारतामध्ये सातत्याने इंधनाचे (fuel) दर वाढतच आहे. एटीएफच्या दरात 277.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एटीएफच्या दरात 0.2 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याले जेट फ्यूलचे दर 1,13,202.33 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचले आहेत. एटीएफच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने विमान प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमान कंपन्या लवकरच प्रवास भाडेवाढीची घोषणा करू शकतात.

प्रवाशांना भाडेवाढीचा फटका?

जेट फ्यूलचे दर प्रत्येक महिन्याच्या एक आणि सोळा तारखेला जाहीर करण्यात येतात. त्यानुसार शनिवारी एटीएफचे दर जारी करण्यात आले. एटीएफच्या दरात 0.2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीसह जेट फ्यूलचे दर आता 1,13,202.33 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचले आहेत. वाढत्या एटीएफ दरवाढीचा फटका हा प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे लवकरच विमान कंपन्या आपल्या तिकिटाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

बारा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

एकीकडे विमानासाठी इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या जेट फ्यूलच्या दरात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे गेल्या बारा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामांन्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज कच्च्या तेलाच्या दरात देखील वाढ झाली आहे. मात्र तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात इंधनाच्या दरात लिटर मागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 120 रुपये लिटर तर डिझेलचे दर प्रति लिटर 104 रुपयांवर पोहोचले आहेत.

संबंधित बातम्या

Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

Petrol diesel price : कच्च्या तेलाचे दर वाढले ; इंधनाच्या दरात कोणतीही वाढ नाही, सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत; आता राज्य सरकारांनी कमी करावा ‘व्हॅट’.. पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट