नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : आर्थिक, विमा आणि सेवा उद्योगात जिओ फायनेन्शिअलच्या रुपाने रिलायन्स समूहाने उडी घेतली आहे. या क्षेत्रात सुधारणांना मोठा वाव आहे. प्रस्थापितांनी या क्षेत्रात सेव देण्यापेक्षा कमाईकडे अधिक लक्ष दिल्याने भारतीय ग्राहकाला एक चांगला, जलद आणि विश्वासू पर्याय हवा आहे. या पोकळीत नेमकी रिलायन्सची एंट्री झाली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वात ही समूहातील ही कंपनी मैलाचा नवीन दगड रोवू शकते. विविध तज्ज्ञांनी जिओ फायनेन्शिअल (Jio Financial Shares) त्यामुळेच लंबी रेस का घोडा वाटत आहे. हा स्टॉक आताच शेअर बाजारात दाखल झाला आहे. सुरुवातीला तो अपेक्षवर उतरला नाही. पण नंतर त्याने पदार्पणातच चांगली घौडदौड सुरु ठेवली आहे. तज्ज्ञांनी त्यामुळेच जिओवर जीव ओवाळून टाकला आहे.
ही आहेत मुख्य कारणं
तज्ज्ञांच्या मते, रिलायन्ससमोर खूप मोठं भारतीय मार्केट आहे. या बाजारात सध्या सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आता कुठं आधुनिकतेची कास धरली आहे. त्यातील अनेकांना अजूनही तंत्रज्ञानाचा अभाव सतावत आहेत. तसेच सरळ, सोपी, जलद सेवा देण्यात त्यांना पुढाकार घेता आलेला नाही. त्यामानाने रिलायन्सकडे बाजारात विस्ताराची मोठी संधी आहे. वितरणासाठी मोठी आयुध आणि इतर कंपन्या हाताशी आहेत. मोठमोठे गुंतवणूकदार, प्रमोटर्स आहेत. अनुभवी नेतृत्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांना एक पॅक्जेड प्रोडक्ट देण्याचे कसब आहे. त्याचा त्यांना फायदा होईल.
तर झपाट्याने होईल विस्तार
बाजारातील तज्ज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज फिजिकल आणि डिजिटल बाबतीत अग्रेसर आहे. जिओ फायनेन्शिअल गेम चेंजर ठरु शकते. JFSL कडे मोठा कस्टमर बेस डेटा उपलब्ध आहे. इतर सहायक कंपन्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कंपनीचा झपाट्याने विस्तार होईल.
या चार व्यवसायात जिओची एंट्री
एका अंदाजानुसार जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज कंपनी चार व्यवसायात उडी घेईल. यामध्ये रिटेल लेंडिंग, असेट मॅनेजमेंट, इन्शुरन्स ब्रोकिंग आणि डिजिटल पेमेंट्चा समावेश आहे. विशेष म्हणजे या बिझनेससाठी यापूर्वीच जागतिक कंपन्यांशी कराराचे सत्र सुरु झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, आकर्षक योजनांचा भडीमार करत जिओ या क्षेत्रात झंझावात आणू शकते.
कर्जाची सुविधा
भारतीय बाजारात सध्या बँका आणि वित्तीय संस्था कर्ज वितरण करतात. पण त्यातील अनेक कच्चे दुवे रिलायन्स हुडकून काढले आहेत. ग्राहकांना कर्ज देताना काही छुपे शुल्क वसूल करण्यात येते. इतर अनेक गोष्टींसाठी ताटकळत ठेवल्या जातं. झटपट कर्ज देणाऱ्या आर्थिक संस्था लूटीचा धंदा करतात. अशा सर्व वातावरणात रिलायन्सला कर्ज वितरणासाठी मोठी संधी आहे. कर्ज वितरणातील अडथळे आणि इतर संस्थांच्या त्रुटी लक्षात घेता जिओला प्रतिसाद मिळू शकतो.
असा मजबूत आहे डेटा बेस
रिलायन्स इंडस्ट्रीजकडे ग्राहकांचा मोठा आकडा ही जमेची बाजू आहे. रिलायन्स रिटेल सध्या जवळपास 25 कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. तर जिओ सध्या 44 कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. त्यामुळे जिओ फायनेन्शिअलकडे मोठा डेटा बेस आहे. येत्या काही दिवसांत या सर्व बाबींचा मोठा फायदा शेअर बाजारात होईल. गुंतवणूकदारांना लॉटरी लागू शकते.