Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे तोट्याचा बिझनेसचं काय करतात पाहा, कुणाला कानोकानंही खबर नसते

| Updated on: Feb 16, 2023 | 9:57 AM

Mukesh Ambani : मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रिलायन्स समूहाने तो गुपचूप बंद केला. येत्या दिवसांत 200 शहरांत ही सेवा सुरु करण्याची अपेक्षा होती. पण ईशा अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने बाळसे धरण्यापूर्वीच या सेवेला कुलूप ठोकले.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे तोट्याचा बिझनेसचं काय करतात पाहा, कुणाला कानोकानंही खबर नसते
ही सेवा बंद
Follow us on

नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रिलायन्स समूहाने तो गुपचूप बंद केला. येत्या दिवसांत 200 शहरांत ही सेवा सुरु करण्याची अपेक्षा होती. पण ईशा अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने बाळसे धरण्यापूर्वीच या सेवेला कुलूप ठोकले. रिलायन्स रिटेल (Reliance Retail) ची कंपनी जिओमार्टने (Jio Mart) जलद ग्रॉसरी डिलिव्हरी सेवा जिओमार्ट एक्सप्रेस (Jio Mart Express) गुपचूप बंद केली. कंपनीने गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये ही सेवा सुरु केली होती. या योजनेत ग्राहकांना अवघ्या 90 मिनिटांत किराणा सामान घरपोच देण्यात येत होती. सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स समूहाने ही सेवा बंद केली आहे. ग्राहकांना जिओमार्ट एक्सप्रेस ॲप गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येत नसल्याची तक्रार आहे. डाऊनलोड करताना ग्राहकांना व्हॉट्सअपवर जिओमार्ट सेवा घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. व्हॉट्सॲपवरुन जिओमार्टच्या ऑर्डर बुक करण्यात येत असून सामान घरपोच डिलिव्हरी करण्यात येत आहे. परंतु, आता ही सेवा जलद मिळत नाही. त्यासाठी काही तास तर एक दिवसही लागू शकतो. घरपोच जलद सामान पोहचविण्याची सेवा यामुळे खंडित झाली आहे. याचा अर्थ जिओमार्टवर आता क्विक सर्व्हिस डिलिव्हरी सेवा बंद करण्यात आली आहे.

रिलायन्सची जिओ प्लॅटफॉर्म्स व्हॉट्सॲपची स्वामित्व असलेली कंपनी मेटा इंकसोबत सहभागीदार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जिओमार्टवर ऑर्डर घेणे हा त्याचाच भाग आहे. रिलायन्सने गेल्या वर्षी नवी मुंबईतून जिओमार्ट एक्सप्रेस सेवा सुरु केली होती. ही सेवा देशभरातील 200 शहरात सुरु करण्याचा कंपनीचा मानस होता.

सूत्रानुसार, जिओमार्ट अशाप्रकारच्या व्यवसायात राहू इच्छित नाही. या व्यवसायात खर्च अधिक होतो. खर्च वाचविण्यासाठी कंपनीने डिलिव्हरी सेवा ही सुरु केली होती. पण आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डिलिव्हरी होईल, पण त्यासाठी वेळ लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

रिलायन्स रिटेलच्या एका अधिकाऱ्यानुसार, जिओमार्ट एक्सप्रेस हा एक पथदर्शी प्रकल्प होता. या पायलट प्रकल्पात काही ग्राहकांना सेवेचा लाभ देण्यात आला. ग्रॉसरीचा व्यवसाय बंद करण्यात येणार नसून डिजिटल कॉमर्स बिझिनेस अंतर्गत विभिन्न प्रकारात ही सेवा सुरु असेल.
जिओमार्ट सध्या 350 हून अधिक शहरात सुरु आहे. तर व्हॉट्सअप आणि मिल्कबास्केटच्या माध्यमातून जिओमार्टची सेवा 35 हून अधिक शहरात सुरु आहे. ही सेवा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर गुंतवणूकदारांची बारीक नजर आहे. कारण या व्यवसायात मोठी भांडवली गुंतवणूक करण्यात येत आहे. सध्या अनेक कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये जलद घरपोच सेवेसाठी तीव्र स्पर्धा सुरु आहे. यामध्ये स्विगीचा Instamart, झोमॅटोचा Blinkit, बिगबास्केटचा BB Now आणि जेम्टोचा सहभाग आहे. रिलायन्स रिटेलने क्विक कॉमर्स स्टार्टअप Dunzo मध्ये पण खूप मोठी गुंतवणूक केली आहे.