नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात (Bank Sector) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खास ऑफर आहे. त्यांच्यासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या अनेक बँकांमध्ये नोकर भरती सुरु आहे. काही बँकांची विविध पदांसाठी परीक्षा ही झाली आहे. तर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची उमेदवारांना प्रतिक्षा आहे. तर सरळ भरती प्रक्रियेतही काही उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. देशातील अनेक बँकाप्रमाणे युनियन बँक ऑफ इंडियानेही (Union Bank Of India) कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली आहे. तरुणांना या पदासाठी नशीब आजमावता येईल. त्यांना नोकरीची संधी (Job Opportunity) मिळू शकते.
तरुणांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बँकेतील विविध पदासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता उमेदवारांना 7 जानेवारी 2023 रोजीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन याविषयीची अद्ययावत माहिती वाचावी. अधिसूचना वाचावी. युनियन बँक ऑफ इंडियाने याविषयीची माहिती ट्विट करुन दिली आहे. तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे ट्विट बँकेने केले आहे.
ही पद भरती करार पद्धतीने करण्यात येणार आहे. म्हणजे कायमस्वरुपी पदासाठी ही भरती प्रक्रिया नाही तर करार पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बँक युनियन लर्निंग अकादमीसाठी ही भरती प्रक्रिया राबवत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता या 7 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक करार पद्धतीने पद भरती करणार आहे. एकूण 33 पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल.
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये External faculties, Academicians, Industry advisors आणि External ULA heads या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवाराला करार पद्धतीने नोकरी देण्यात येईल. ही भरती प्रक्रिया मुंबई, भोपाळ, हैदराबाद, बेंगळुरु, गुडगाव, लखनऊ, मंगळुरु या शहरात राबविण्यात येणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. सरत्या वर्षात 6 महिन्यांमध्ये या शेअरने 135 टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम सहा महिन्यातच दुप्पट झाली आहे.