जून महिना गुंतवणूकदारांसाठी घाम फोडणारा ठरला. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्समध्ये कमालीची घसरण झाली. एकट्या जून महिन्यात गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपये डुबले (Investors has lost). परंतु, त्यांच्या या जखमांवर जुलै मलमपट्टी लावू शकतो. नुसतीच मलमपट्टी नाहीतर त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो. जर आतापर्यंतच्या जुलै महिन्याच्या इतिहासावर (July History) नजर टाकली तर बाजाराने जबरदस्त रिटर्न (Solid Return) दिल्याचे दिसून येते. कॉर्पोरेट डेटाबेस Ace Equity द्वारे एकत्रित केलेल्या 15 वर्षांच्या आकडेवारीवरुन तरी असे अनुमान काढणे संयुक्तीक ठरते. गेल्या 15 वर्षांच्या आलेखावरुन लक्षात येते की, सेसेंक्सने 6 वेळा 5 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे तर 9 वेळा एक टक्क्यांहून अधिकचा परतावा देण्यात सेंसेक्स यशस्वी ठरला आहे. मागील 15 वर्षांत जुलै महिन्यात निर्देशांकाने (Sensex) 5 टक्क्यांहून अधिकची घसरण पाहिलेली नाही. जुलै 2019 मध्ये निर्देशांकात सर्वाधिक म्हणजे 4.86 टक्क्यांची घसरण झाली होती. तर जुलै 2009 मध्ये मार्केट सर्वोच्च पातळीवर म्हणजे 8.12 टक्क्यांच्या रॉकेट स्पीडने पळाले होते.
जुलै महिन्यात अनेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल घोषीत करतात. सध्याच्या महागाईच्या झळा या निकालावर परिणाम करतील. जुलै महिन्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक धोरणाचा पुनर्विचार करेल. अमेरिकेची केंद्रीय बँक सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेऐवजी महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच देशात मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाळ्यामुळे उत्पादन वाढेल आणि त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. गेल्यावर्षी जुलै महिन्यात निर्देशांकात 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. जुलै 2020 मध्ये 7.71 टक्के तर जुलै 2018 मध्ये 6.16 टक्क्यांची उसळी निर्देशांकाने घेतली होती.
आयआयएफएल सिक्योरिटीजच्या ताज्या अभ्यास अहवालानुसार, बाजार सकारात्मक दिशेकडे प्रवासासाठी संघर्ष करत आहे. बाजारात म्हणावी तशी तेजी दिसून येत नाही. कॅश मार्केटचे मूल्य सातत्याने घसरत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. एनएसई आणि बीएसई मध्ये जून महिन्यात एकूण रोखीतल्या उलाढालीत 23 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टी 15,200 ते 16,200 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील बाजाराच्या प्रगतीचा अहवाल जोखला असता निफ्टी सातत्याने तीन हून अधिकची घसरण बघितलेली नाही. गेल्या 15 वर्षांच्या आलेखावरुन लक्षात येते की, सेसेंक्सने 6 वेळा 5 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे तर 9 वेळा एक टक्क्यांहून अधिकचा परतावा देण्यात सेंसेक्स यशस्वी ठरला आहे. मागील 15 वर्षांत जुलै महिन्यात निर्देशांकाने 5 टक्क्यांहून अधिकची घसरण पाहिलेली नाही. तर जुलै 2009 मध्ये मार्केट सर्वोच्च पातळीवर म्हणजे 8.12 टक्क्यांच्या रॉकेट स्पीडने पळाले होते.