नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात बऱ्याच कंपन्या गुंतवणूकदारांना अनेक लाभ पोहचवतात. लाभांश, बोनस शेअर, शेअर स्प्लिटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली वार्ता आहे. ही कंपनी एका शेअरवर 4 शेअरचा बोनस देत आहे. ही कंपनी याच आठवड्यात एक्स-बोनस स्टॉकवर ट्रेड करणार आहे. या कंपनीने यापूर्वी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीने ग्राहकांना तगडा लाभांश दिला आहे. या कंपनीची कामगिरी पण दमदार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो. या कंपनीचे मार्केट कॅप 9,436 घरात आहे.
काय आहे रेकॉर्ड डेट
कामा होल्डिंग कंपनीने (kama holding limited) गुंतवणूकदारांसाठी ही लॉटरी लावली आहे. दहा रुपयांच्या फेसव्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना कंपनी 4 शेअर बोनस देणार आहे. या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट 17 ऑक्टोबर 2023, मंगळवार आहे. ज्या गुंतवणूकदारांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये दिसेल, त्यांना ही कंपनी बोनस शेअर देणार आहे.
लाभांश पण तगडा
कामा होल्डिंगच्या गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष जोरदार राहिले आहे कंपनीने पहिल्यांदा मार्च महिन्यात 84 रुपयांचा लाभ दिला. त्यानंतर कंपनीने या ऑगस्ट महिन्यात 82 रुपयांचा लाभांश दिला. यापूर्वी कामा होल्डिंगने 2022 मध्ये शेअर परत खरेदी केले. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. ज्यांच्याकडे कंपनीचे अधिक शेअर आहेत. त्यांची मोठी कमाई झाली.
शेअर बाजारातील कामगिरी
शुक्रवारी कामा होल्डिंग्सच्या शेअरचा भाव 0.74 टक्के तेजीसह 16,270.65 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 31 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे या शेअरने गेल्या एक महिन्यात 4 टक्क्यांची घौडदौड केली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 9,436 घरात आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने मोठी आघाडी घेतली आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.