1 एप्रिलपासून बँकेच्या PF, TDS आणि ITR च्या 6 नियमात बदल, तुमच्यावरही ‘हा’ परिणाम होणार

| Updated on: Mar 28, 2021 | 3:15 AM

1 एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून बँकेच्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत.

1 एप्रिलपासून बँकेच्या PF, TDS आणि ITR च्या 6 नियमात बदल, तुमच्यावरही हा परिणाम होणार
आयकर
Follow us on

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून बँकेच्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. या दिवसापासून केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणी होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्न आणि बचतीवर होणार आहे. म्हणूनच 1 एप्रिलपासून बँक, पीएफ आणि आयकराच्या नियमांमध्ये कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे (Know 6 Changes in Bank PF TDS and ITR rules from 1 April 2021).

1. ITR भरणं सोपं होणार

1 एप्रिलपासून आयकर रिटर्न भरणं सोपं होणार आहे. कारण सरकारने करदात्यांच्या पगाराशिवायच्या डिविडंड इनकम, कॅपिटल गेन इनकम, बँक डिपॉजिट इंट्रेस्ट इनकम, पोस्ट ऑफिस इंट्रेस्ट इनकम इत्यादी उत्पन्नाची माहिती आधीच अर्जात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतालय.

2. ‘या’ बँकांचे चेकचा कोणताही उपयोग राहणार नाही

1 एप्रिलपासून देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि इलाहाबाद बँकेचे चेक कोणत्याही कामाचे राहणार नाहीत. यंदाच्या अर्थसंकल्पात या सर्व बँकांच्या विलगीकरण करण्याची घोषणा करण्यात आलीय.

3. 75 वर्षांवरील नागरिकांना आयटीआर भरावा लागणार नाही

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे 1 एप्रिलपासून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यापुढे आयटीआर भरावा लागणार नाहीये. हा लाभ पेन्शन आणि बँकेतील पैशांवरील व्याजावर अवलंबून असणाऱ्या नागारिकांनाच मिळणार आहे.

4. टीडीएसच्या आयकर नियमांमध्ये बदल

जर एखाद्या व्यक्तीने आयटीआर फाईल केले नाही तर त्याच्या बँकेतील पैशांवर दुप्पट दराने टीडीएस लागेल. म्हणजेच तुम्हाला आयकर बसत नसला म्हणून तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुमच्या बँकेतील पैशांमधून दुप्पट दराने टीडीएस कपात होईल.

5. पेंशन फंड मॅनेजरला अधिक दर वसूल करण्याची परवानगी

परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या उद्देशाने पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने पेंशन फंड मॅनेजरला ग्राहकांकडून अधिक दराने वसुली करण्याची परवानगी दिलीय.

6. पीएफवरील आयकराच्या नियमांमध्ये बदल

एका आर्थिक वर्षात पीएफमध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांची गुंतवणूक केल्यास 2.5 लाखांपेक्षा अधिकच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजासाठी कर द्यावा लागणार आहे. वॉलंटरी प्रोविडंट फंड (व्हीपीएफ) आणि पब्लिक प्रोविडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणूक केल्यास 5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

हेही वाचा :

Advance Tax Payment: अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची आज शेवटची संधी; अन्यथा मोठा दंड

Income Tax Raid : चेन्नईच्या सर्वांत मोठ्या ज्वेलर्स परिसरात छापेमारी, 1000 कोटींच्या अघोषित संपत्तीचा खुलासा?

Income tax Refund नाही आला? तात्काळ चेक करा ‘ही’ माहिती, वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Know 6 Changes in Bank PF TDS and ITR rules from 1 April 2021