आजकाल डिजीटलचा जमाना आहे. सगळे जण कार्ड किंवा गूगल पे, पेटीएम वापरून स्कॅनिंग करून पैशांची देवाण-घेवाण (Online Payment) करतात. अवघ्या काही जणांच्या पाकिटात कॅश- सुट्टै पैसे सापडतात. मात्र याआधी असं नव्हतं. आपण एक-एक रुपयासाठी ( Rupee) दिवसरात्र मेहनत करत असतो. मात्र हा रुपया नक्की बनला कसा हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्ही गावात वास्तव्य केलं असेल किंवा कधी गावाला गेला असाल, तर रुपये-पैशांशी निगडीत अनेक स्थानिक शब्द तुमच्या कानावर पडले असतील. कधी कवडी, दमडी, धेला, पाई हे शब्द ऐकले आहेत का ? बऱ्याचदा बोलता बोलता असे शब्द आपण ऐकतो. ‘आपकी पाई-पाई चुका दूंगा’ किंवा ‘एक दमडी नाही मिळणार’, अशी वाक्य आपण अनेक वेळा (मोठ्यांच्या तोंडून) ऐकली असतील. पण हे पाई किंवा दमडी म्हणजे नक्की काय हे माहीत आहे का ? ही सगळी चलनांचीच नावं आहेत. एक रुपया याच सर्व चलनांमधून बनतो. इंग्रजीत त्याला ‘बक्स’ (bucks) आणि डॉलरच्या (Dollar) तुलनेत ‘सेंट’ म्हटलं जातं. जाणून घेऊया काय आहे हा रुपयाचा इतिहास..
पूर्वीच्या काळी रुपयाचे झालेले वर्गीकरण बघूया. पूर्वी एक कवडीतून दमडी, दमडीतून धेला आणि धेला पासून पाई बनायची. पाईतून बनायचा पैसा. पैशाचे मोठे रूप म्हणजे आणे आणि अनेक आणे मिळून बनायचा रूपया. तुम्ही चार आणे (25 पैसे) आणि आठ आणे (50 पैसे) हे शब्दही ऐकले असतीलच. 16 आणे मिळून बनायचा 1 रुपया. म्हणजेच आठ आण्याची 2 नाणी किंवा चार आण्याची 4 नाणी मिळून 1 रुपया होतो.
पूर्वीच्या काळी 256 दमडी मिळून 192 पाई बनत असे तर 191 चा 128 धेला आणि 128 धेला मिळून 64 पैसे बनत. 64 पैशांचे बनत असे 16 आणे आणि 16 आण्यांचा बनायचा 1 रुपया. पण आता अशी स्थिती नाही, कारण दमडी, पाई, धेला या सगळ्याचा काळ गेला. चार आणे आणि आठ आण्याची नाणीही बंद झाली. 1 रुपयाचे नाणे अजूनही सुरू असले तरी ते फारसे वापरात नाहीत, कोणी पटकन घेतही नाही. 3 (फूटी) कवडी पासून 1 कवडी, 10 कवडीपासून 1 दमडी, 2 दमडीतून 1 धेला, 1.5 पाई पासून 1 धेला, 3 पाईतून 1 पैसा ( जुना), 4 पैशांतून 1 आणे आणि 16 आण्यांनी 1 रुपया बनत असे.
बऱ्याच वेळा लोकं बोलता- बोलता रुपया-पैशांशी संबंधित म्हणींचा उच्चार करतात. उदा – एक फुटकी कवडीही देणार नाही. किंवा चमडी जाए पर दमडी न जाए. पाई-पाई का हिसाब रखना चाहिए ( प्रत्येक पैशाचा हिशोब राखला पाहिजे). सोलह आने सच ( शंभर टक्के खरी गोष्ट), अशा अनेक म्हणी वापरल्या जातात.