मुंबई : सोन्याच्या भावात घसरणीचे सत्र कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज (गुरुवारी) महाराष्ट्रात सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदविली गेली. मुंबई, नागपूर, नाशिक व पुण्यात सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या आत घसरला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 45800 व 24 कॅरेट सोन्याला 49970 रुपये भाव मिळाला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी 400 रुपयांची घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याची घसरण दिसून येत आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता(SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थ घडामोडी यामुळे गुंतवणूकदारांत (Investors) अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव पुढील प्रमाणे
• मुंबई- 49,970 रुपये (430 घट)
• पुणे- 49,900 रुपये (660 घट)
• नागपूर- 49,900 रुपये (660 घट)
• नाशिक- 49,900 रुपये (660 घट)
• मुंबई- 45,800 रुपये (400 घट)
• पुणे- 45,760 रुपये (390 घट)
• नागपूर- 45,760 रुपये ( 390 घट)
• नाशिक- 45,760 रुपये (390 घट)
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात पडझडीचं सत्र, सेन्सेक्स 104 अंकांनी घसरला; निफ्टी डाउन
Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या