नवी दिल्ली – आयकर पात्र उत्पन्न (INCOME TAX ELIGIBLE) गटातील व्यक्तींसमोर आयकर व्यवस्थापनाची खरी कसोटी असते. कराचे वाढते अधिक्य कमी करण्यासाठी करबोजात घट करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. करदाते बहुतांश वेळा गृहकर्जाचा (HOME LOAN) मार्ग अवलंबतात. हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याबरोबरच आयकरात थेट सवलतीचा लाभही प्राप्त होतो. केंद्र सरकार गृह खरेदीदारांना प्रोत्साहित करण्यासाठी करात सवलत प्रदान केली जाते. मात्र, तुम्ही गृह कर्जाच्या सहाय्याने घराची निर्मिती केली असल्यास तुम्हाला काही मर्यादा निश्चित असतात. गृहकर्जाच्या सहाय्याने खरेदीवर कराचा लाभ घ्यायचा असल्यास धारणा कालावधी (होल्डिंग पीरिअड) महत्वाचा ठरतो. होल्डिंग कालावधीच्या (HOLDING PERIOD) दरम्यान घराची विक्री केल्यास मिळालेली कर सवलत थांबविली जाते.
तुम्ही गृहकर्जाच्या सहाय्याने घर घेतले असल्यास किमान पाच वर्षापर्यंत त्याची विक्री करू शकत नाही. पाच वर्षाच्या आत घराची विक्री केल्यास कर सवलतीसाठी प्राप्त लाभ जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क अन्य लाभ कलम 80 अंतर्गत मिळत नाही. त्यामुळे लाभ प्राप्त एकूण रक्कम मूळ रकमेत समाविष्ट केली जाते. एकूण उत्पन्नावर कर अदा करावा लागेल. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कलम 24-बी अंतर्गत मिळालेल्या लाभावर कोणताही परिणाम होत नाही. आयकर विभागाच्या नियमानुसार सेक्शन 24 बी अंतर्गत 2 लाख रुपयांची कर सवलत अदा केली जाते.
गृहकर्ज ईएमआयचे दोन भाग असतात. मुख्य रकमेचा पहिला भाग आणि व्याजाचा दुसरा भाग असतो. मुख्य रकमेच्या परतफेडीवर कलम 80-सी अंतर्गत कर सवलत अदा केली जाते. व्याज रकमेच्या परतफेडीवर कलम 24 बी अंतर्गत सवलत प्रदान केली जाते. कलम 80 सी अंतर्गत मर्यादा 1.5 लाख रुपयांची तर कलम 24-बी अंतर्गत 2 लाखांची मर्यादा असते. अशाप्रकारे गृहकर्जावर एका वित्तीय वर्षात 3.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत प्रदान केली जाते.
तुम्ही जर घर खरेदीसाठी होम लोन घेण्याच्या विचारात असाल सर्वात आधी याचा शोध घ्या की तुम्हाला कोणत्या ठिकाणी स्वस्तात गृहकर्ज मिळत आहे. चार ठिकाणी होम लोनची चौकशी करा जिथे स्वस्तात कर्ज उपलब्ध असेल तिथून तुम्ही कर्ज घेऊ शकता. कर्ज घेताना ते कमीत कमी कसे राहील याकडे देखील लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर काही बचत केली असेल तर ही बचत घर खरेदीसाठी तुम्ही वापरू शकता. याचा फायदा असा की, त्यामुळे तुम्हाला कमी गृहकर्ज घ्यावे लागेल आणि त्यामुळे तुम्हाला व्याजापोटी द्याव्या लागणाऱ्या पैशांमध्ये बचत होऊ शकते.