नवी दिल्ली : आज सकाळीच तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर केला आहे. कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) हिंदोळ्यावर असले तरी त्यांनी अजूनही 80 डॉलर प्रति बॅरलचा दर गाठलेला नाही. मध्यंतरी क्रूड ऑईल 70 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आले होते. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesle Price) जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले. तुमच्या शहरातील इंधनाचा काय आहे दर? इंधनाच्या किंमती तुम्हाला या एसएमएस क्रमांकावरुन सुद्धा कळतात.
अशी झाली घसरण
जागतिक बाजारात कच्चा तेलाने जबरदस्त उसळी घेतली होती. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. नंतर त्यात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय जून 2017 पूर्वी इंधनाच्या किंमती दर 15 दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज भावात बदल होतो.
13 महिन्यांत दिलासा नाही
कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या 13 महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 22 मे 2022 रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरवर पोहचले. तेल कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.
अशी भरते सरकारची तिजोरी
एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 18 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.
प्रति लिटर इतका फायदा
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
भाव एका SMS वर
दरात कपात
केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.