नवी दिल्ली : शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) तेजी-घसरणीचं सत्र कायम असल्याचं चित्र आजही दिसून आलं. काल (बुधवारी) शेअर बाजारातील घसरणीनंतर आज (गुरुवारी) तेजीचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजारात विक्रीचं (SHARE BYUING) सत्र होतं. मात्र, आज शेअर खरेदीकडे गुंतवणुकदारांचा कल पाहायला मिळाला. त्यामुळे प्रमुख निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. आज एफएमसीजी सेक्टरमध्ये (FMCG SECTOR) सर्वाधिक तेजी राहिली. शेअर बाजारात आज प्रमुख निर्देशांकात खरेदीचं सर्वाधिक प्रमाण राहिलं. आर्थिक परिणामांच्या सर्वोत्तम प्रदर्शानामुळे एचयूएल मध्ये चार टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीज. आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस मध्ये 1-1 टक्क्यांहून अधिक वाढ राहिली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज 701 अंक किंवा 1.23 टक्क्यांच्या वाढीसह 57,521 वर बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 17,245 वर बंद झाला. हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, लार्सेन अँड टूब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक वधारणीचे शेअर्स ठरले.
शेअर बाजारात सुरुवातीपासूनच तेजीचं चित्र दिसून आलं. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज किमान नफेखोरी पाहायला मिळाली. त्यामुळे शेअर बाजाराची कामगिरी गेल्या चार दिवसांच्या तुलनेत सरस ठरली. मीडिया वगळता निफ्टी वर सर्वे निर्देशांक वाढीसह बंद झाले. एफएमसीजी सेक्टरमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1665 स्टॉक्स तेजीसह बंद झाले. तर 1753 स्टॉक्स घसरण दिसून आली.
एचयूएल (4.51%)
एचडीएफसी लाईफ (4.34%)
एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (3.97%)
यूपीएल (3.24%)
एशियन पेंट्स (3.16%)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (2.75%)
बजाज ऑटो (-1.82)
हिंदाल्को (-0.75%)
भारती एअरटेल (-0.68%)
एम अँड एम (-0.43%)
एचसीएल टेक (-0.28%)