नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : कोटक महिंद्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी राजीनामा दिला आहे. उदय कोटक 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. त्यांचा कालावधी संपण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा 1 सप्टेंबर 2023 पासून लागू झाला आहे. कोटक महिंद्र बॅंकेने शनिवारी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहीती दिली. नवीन एमडी येईपर्यंत या पदाचा कार्यभार सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता सांभाळणार आहेत.
उदय कोटक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या पदाचा कार्यभार येत्या 31 डिसेंबरपर्यंत जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर दीपक गुप्ता सांभाळणार आहेत. अर्थात त्यासाठी कोटक बॅंकेला आरबीआय आणि मेंबर्स ऑफ बॅंककडून मंजूरी घ्यावी लागणार आहे. उदय कोटक कोटक महिंद्र बॅंकेचे नॉन-एक्झुकेटिव्ह डायरेक्टर म्हणून बॅंकेसोबत असणार आहेत. उदय कोटक यांचा कार्यकाल 31 डिसेंबर 2023 रोजी समाप्त होणार होता. कोटक महिंद्र बॅंकेने नवीन एमडी आणि सीईओ पदासाठी आधीच आरबीआयला अर्ज केला आहे. नवीन सीईओचे कामकाज 1 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे.
माझ्याकडे आणखी काही महिने शिल्लक होते. परंतू मी तत्काल प्रभावाने राजीनामा देत आहे. मी काही काळापासून याविषयी विचार करीत होतो आणि मला वाटतं हा संस्थेसाठी चांगला काळ आहे. मी या शानदार कंपनीचा फाऊंडर, प्रमोटर आणि महत्वपूर्ण शेअरधारक असल्याच्या नाते येणाऱ्या काही वर्षांत जगाचे नेतृत्व करणाऱ्या भारताचे स्वप्न पाहत असल्याचे उदय कोटक यांनी बॅंकेच्या संचालक मंडळाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
उदय कोटक यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकत म्हटले आहे की आपण बॅंकेचे नेतृत्व नवीन पिढीच्या हाती सोपविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी पदापासून दूर होत आहे, कोटक महिंद्रचे चेअरमन, आणि मी स्वत: आणि आमचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर या तिघांना या वर्षअखेर आपले पद सोडायचे आहे असे उदय कोटक यांनी म्हटले आहे.
उदय कोटक यांनी 1985 मध्ये एका नॉन बॅंकींग फायनान्स कंपनीच्या रुपात या संस्थेची पायाभरणी केली होती. पुढे जाऊन त्याचे बॅंकेत रुपांतर झाले. तेव्हापासून तेच या बॅंकेचे नेतृत्व करीत आहेत. साल 2023 बॅंक कमर्शियल लॅंडर झाली. ब्लुमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनूसार उदय कोटक यांची संपत्ती 13.4 बिलियन डॉलर म्हणजेच 1.10 लाख कोटी रुपये इतकी आहे.