Lamborghini Car Fire : धड धड पेटली लेम्बोर्गिनी कार, गौतम सिंघानियाने शेअर केला Video, सुरक्षेवर ठेवले बोट

| Updated on: Dec 26, 2024 | 5:26 PM

Lamborghini Car Fire Costal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवर एका धावत्या लेम्बोर्गिनी कारला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनंतर रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Lamborghini Car Fire : धड धड पेटली लेम्बोर्गिनी कार, गौतम सिंघानियाने शेअर केला Video, सुरक्षेवर ठेवले बोट
लेम्बोर्गिनी कार
Follow us on

मुंबईतील कोस्टल रोडवर एका धावत्या आलिशान कारला आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये या कारला आग लागल्यानंतर त्यातून धूराचे लोट येऊ लागले. हा व्हिडिओ बिझनेस जगातातील बडे नाव गौतम सिंघानिया यांनी शूट केला होता. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनंतर रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काय घडलं कोस्टल रोडवर?

घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने या दुर्घटनेची माहिती दिली. त्यानुसार, ही घटना बुधवारी रात्री जवळपास 10:20 मिनिटाला घडली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, याविषयीची माहिती मिळताच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ मदत पाठवण्यात आली. अग्निशमन दलाच्या कारने आगीवर नियंत्रण मिळवले.

हे सुद्धा वाचा

45 मिनिटांनी आगीवर नियंत्रण

घटनास्थळ अग्निशमन दल मदतीला धावले. 45 मिनिटांच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी लेम्बोर्गिनी कारच्या आगीवर नियंत्रण मिळवले. नारंगी रंगाची कार धडा धड जळत होते. घटना घडली तेव्हा काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ही कार धडाधड जळत असल्याचे आणि धुराचे लोट बाहेर येत असल्याचे दिसते.

गौतम सिंघानिया यांनी X वर अपलोड केला व्हिडिओ

या घटनेचा व्हिडिओ बिझनेस टायकून गौतम सिंघानिया यांनी तयार केला आणि तो त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावरून शेअर केला. त्यांनी X वर व्हिडिओ अपलोड केला. लेम्बोर्गिनी कार ही गुजरातमधील असल्याचे क्रमांकावरून समोर येत आहे. तिच्या पाठीमागील भागातून, केबिनमधून धूराचे लोट बाहेर पडताना दिसत आहे.

सुरक्षेसंबंधी विचारला सवाल

“मी मुंबईतील कोस्टल रोडवर आगीच्या विळख्यात सापडलेली लेम्बोर्गिनी कार पाहिली. लेम्बोर्गिनी सारख्या कारमध्ये आगीची ही घटना तिची विश्वसनियता, सुरक्षा मानकाच्या कसोटीवर चिंता व्यक्त करणारी आहे.”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिली आहे. महागड्या कारमध्ये अशी घटना घडू शकते, यावर त्यांनी जणू प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.