मुंबई : कोरोना महामारीनं (Corona Pandemic) अनेकांचा बाजार उठवला. एकही क्षेत्र याला अपवाद ठरलं नाही. अशातच आता कोरोनाचा फटका हा एलआयसी पॉलिसीलाही (LIC Policy) बसल्याचं समोर आलं आहे. एलआयसीच्या पॉलिसी विक्रीत घट झाली असून याबाबतची आकडेवारी आता समोर आली आहे. एकूण वैयक्तिक आणि ग्रूप पॉलिसी (Individual Policy & Group Policy) या दोन्हीतही घट झाली आहे. LICचा आयपीओ येणार आहे. या आयपोची गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. अशातच एलआयसीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2018-19 मध्ये 7.5 कोटी विक्री झाली होती. हीच विक्री पुढच्या वर्षात 16.76 टक्क्यांनी घटली आहे. 2019-20मध्ये 6.24 कोटी इतकी घट LIC पॉलिसीच्या विक्रीत नोंदवण्यात आली आहे.
2018-19च्या तुलनेत 2019-20मध्ये 16.76 टक्के इतकी पॉलिसी विक्री झालेली असताना आता 2020-21 मध्येही घट सुरुच असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. 2020-21 मध्ये 15.84 टक्के घट एलआयसी पॉलिसीच्या विक्रीत नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 5.25 कोटी इतकीच एलआयसीची विक्री झाली होती. कोरोना महामारीमुळे विक्रीत घट झाली असल्याचं कंपनीनं म्हटलंय.
LICला 2020-21 आणि 2021-22च्या पहिल्या तिमाहीतही विक्रीत फारशी वाढ झाली नसल्याचंच पुन्हा एकदा दिसून आलं आहे. या दरम्यानच्या काळात 46.20 टक्के विक्री कमी झाली तर त्यानंतर 34.93 टक्के विक्री घटली. दरम्यान, आता कोरोना महामारीचा प्रभाव ओसरत असल्यामुळे ऑफलाईन पॉलिसी विक्रीला पुन्हा एकदा वेग आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पॉलिसी विक्री वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला जातो आहे.
एलआयसीनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीत एकीकडे विक्रीमध्ये घट झाली, तर दुसरीकडे डेथ क्लेम म्हणजेच मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या पॉलिसी क्लेमच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या या काळात मागच्या तीन वर्षात कशापद्धतीनं डेथ क्लेम करण्यात आलेत आहेत, त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे –
वर्ष 2019 – 17,128.84 कोटी रुपये – 6.79
वर्ष 2020 – 17,527.98 कोटी रुपये – 6.86
वर्ष 2021 – 23,926.89 कोटी रुपये – 8.29
देशाची सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीचा आयपीओ येत्या काही दिवसांत येणार असल्याचं बोललं जातंय. 10 मार्च रोजी हा आयपीओ सुरु होईल आणि 14 मार्चला बंद होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. याची किंमत 2 हजार ते 2 हजार 100 रुपयांपर्यंत झालंय. सरकारनं 13 फेब्रुवारीला एलआयसीचा ड्राफ्ट पेपर जमा केला होता. सरकार आयपीओच्या माध्यमातून 5 टक्के भागीदारी विकतेय. एलआयसी आयपीओच्या माध्यमातून 31.6 कोटी शेअर्स सादर करणार आहे.
LIC IPO : तरच मिळेल तुम्हाला ‘एलआयसी’ आयपीओ; कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ‘ही’ डेडलाईन !
LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना