मुंबई : आयुष्याच्या उत्तरार्धात तसेच मुला-मुलीच्या लग्नासाठी ठोस रक्कम सोबत असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कित्येक नागरिक अनेक विमा उतरवात. ही गरज लक्षात घेऊन एलआयसीने (LIC) कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे. या पॉलिसीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी रोख रक्कम मिळणे सोपे झाले आहे. (LIC kanyadan policy and premium information)
या पॉलिसीमध्येच तीचा उद्देश समजून येतो. दाम्पत्याला भविष्यात मुलीच्या लग्नाची चिंता नसावी म्हणून ही पॉलिसी तयार केली आहे. कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते. रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावे लागतील. त्यानंतनर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.
या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे. मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत.
> अपघातात मृत्यू झाल्यानंतर परिवाराला 20 लाख रुपये मिळणार.
>> पॉलिसीदरम्यान विनाधारकाचा मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख रुपये मिळणार.
>> 3 वर्षे प्रिमियम भरल्यानंतर विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज घेता येईल.
संबंधित बातम्या :
सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर
SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा
Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका
(LIC kanyadan policy and premium information)