नवी दिल्ली : आधुनिक युगात लोकांकडे गुंतवणुकीपासून (Investment) ते विमा खरेदी करण्यापर्यंत अनेक पर्याय समोर आहेत. परंतु, भारतीय जीवन विमा महामंडळावर (LIC) आज लोकांचा मोठा विश्वास आहे. परंपरागतसोबत चोखंदळ गुंतवणूकदार आजही एलआयसीत गुंतवणूक करतात. एलआयसीमार्फत विम्यासोबत ग्राहकांना अनेक गुंतवणूक योजनाही दिल्या जातात. त्यातील गुंतवणूकीवर जोरदार परतावा (Return) तर मिळतोच, पण विम्याचे कचवही मिळते. या विमा पॉलिसीमध्ये कर बचतीची सुविधा ही मिळते.
कोणतीही व्यक्ती एलआयसीमध्ये गुंतवणूक करु शकते. जर तुम्हाला ही या योजनेत रक्कम गुंतवायची असेल तर एलआयसीच्या रेग्युलर प्रीमिअम युनिट लिंक्ड प्लॅन, SIIP मध्ये गुंतवणूक करता येते. या विमा योजनेत 40 हजार रुपये वार्षिक 21 वर्षांपर्यंत गुंतवावे लागतील. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला तिप्पट परतावा मिळेल.
ही पद्धतशीर गुंतवणूक विमा योजना (Systematic Investment Insurance Plan- SIIP) आहे. एलआयसीच्या SIIP मध्ये गुंतवणूकदाराला 21 वर्षांपर्यंत हप्ते भरावे लागतात. यामध्ये मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमिअमची रक्कम गुंतविता येते.
जर एखादा गुंतवणूकदार यामध्ये वार्षिक पर्याय निवडून प्रीमिअम जमा करेल, तर त्याला 40 हजार रुपये गुंतवावे लागतील. या रक्कमेवर त्याला वार्षिक व्याज मिळेल. ही रक्कम पुन्हा मुद्दलमध्ये ग्रहित धरुन पुन्हा व्याज देण्यात येते. चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
सहामाही पर्याय निवडीनंतर 22000 रुपयांचा प्रीमियम जमा करावा लागेल. तिमाहीचा पर्याय निवडल्यास 12 हजार रुपये, मासिक निवडल्यास 4000 रुपये 21 वर्षांपर्यंत जमा करावे लागतील. एकूण 10,08,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
21 वर्षानंतर मॅच्युरिटीवर गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्याऐवजी जवळपास 35 लाख रुपये मिळतील. जी तुमच्या गुंतवणूक रक्कमेपेक्षा तीन पट्टीने जास्त असेल. SIIP योजनेत गुंतवणूकदारांना 4,80,000 रुपयांचे विमा कवच मिळते.
तुम्ही ही योजना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने खरेदी करु शकता. ऑफलाईन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.