नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) नुकतेच चौथ्या तिमाहीचे निकाल घोषीत केले. आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत कंपनीने पाच पट लाभ मिळविला. कंपनीचा नफा वाढून 13,191 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षात याच समान तिमाहीत कंपनीला 2,409 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या कामगिरीमुळे आता एलआयसीच्या शेअरवर (LIC Share) गुंतवणूकदारांसह बाजार तज्ज्ञ लट्टू झाले आहेत. मोतीलाल ओसवाल यांनी हा स्टॉक खरेदीसाठी रेटिंग दिले आहे. तर Emkay ने हा स्टॉक कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इतर ही ब्रोकर्सने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे.
LIC ची जोरदार कामगिरी
एलआयसीचा संपूर्ण आर्थिक वर्षातील निव्वळ नफा कित्येक पटीने वाढला. आता हा 35,997 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये हा निव्वळ नफा 4,125 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत कंपनीने पाच पट लाभ मिळविला. कंपनीचा नफा वाढून 13,191 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षात याच समान तिमाहीत कंपनीला 2,409 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
महसूल घटला
LIC च्या पहिल्या वर्षातील प्रीमियममधील कमाई मार्च, 2022 मध्ये 14,663 कोटी रुपये होती. मार्च 2023 मध्ये हा महसूल 12,852 कोटी रुपयांवर घसरला. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एकूण महसूल मात्र घटला आहे. हा महसूली आकडा आता 2,01,022 कोटी रुपये आहे. तर गेल्यावर्षी समान तिमाहीत महसूल 2,15,487 कोटी रुपये होता.
जेएम फायनेन्शिअल (JM Financial)
ब्रोकरेज फर्म जेएम फायनेन्शिअलने LIC चा शेअर खरेदीचे रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजने हा स्टॉक 940 रुपयांपर्यंत उसळी घेईल असा अंदाज वर्तविला. सध्या या शेअरमध्ये 55 टक्क्यांची तेजी दिसून येईल, असा अंदाज आहे.
एमके (Emkay)
Emkay ने एलआयसीचा शेअर पोर्टफोलिओत कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या ब्रोकरेज हाऊसने त्यासाठी
660 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. ब्रोकरेजनुसार या शेअरमध्ये 9 टक्के उसळी येईल.
एक्सिस कैपिटल (Axis Capital)
ब्रोकरेज फर्म एक्सिस कॅपिटलने एलआयसीचा शेअर कायम ठेवला. या फर्मने 720 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. या फर्मनुसार, स्टॉकच्या सध्याच्या भावात 19 टक्के तेजी दिसून येईल.
मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal)
ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 830 रुपयांचे टार्गेट सेट केले. सध्याच्या भावापेक्षा या शेअरमध्ये 37 टक्के तेजी दिसून येईल.
हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.