नवी दिल्ली : जर तुम्ही ही एलआयसीचे ग्राहक (Customer) आहात आणि तुमची रक्कमही अडकली असेल तरी ही बातमी तुमच्यासाठीच. या दावा न केलेल्या रक्कमेवर (LIC Unclaimed Amount) तुम्हाला असा दावा करता येईल. बरेच ग्राहक एलआयसी पॉलिसी घेतात. पण काही हप्त्यानंतर ती बंद होते. पण मग ते रक्कमेवर दावा करत नाहीत. ती रक्कम किती आहे आणि ती कशी मिळविता येईल, या विषयीची प्रक्रिया (Process) अंत्यत सोपी आहे.
एलआयसी त्यांच्या ग्राहकांना दावा न केलेली रक्कम परत मिळण्यासाठी मदत करते. त्यासाठी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या अडकलेल्या रक्कमेची माहिती सहज मिळविता येते. पण त्यासाठी पॉलिसीचा आणि तुमचा योग्य तपशील सादर करावा लागेल.
त्यासाठी अगोदर एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर licindia.in वर जावे लागेल. त्याठिकाणी तुम्हाला पॉलिसी क्रमांक, पॉलिसी होल्डरचे नाव, जन्मतारीख, पॅनकार्ड क्रमांक यांचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर त्याठिकाणीचा पर्याय निवडून रक्कम काढता येईल.
ही माहिती जमा केल्यावर ग्राहकांना एलआयसी यासंबंधीचा दावा, त्यातील रक्कम याविषयी संपूर्ण माहिती देते. त्यानंतर ग्राहकाला पुढील सोपास्कार पार पाडले की सदर रक्कम मिळविता येते. पण त्यासाठी केवायसीचा तपशील द्यावा लागेल. त्याशिवाय रक्कम काढता येत नाही.
एलआयसीमध्ये थकीत रक्कम काढण्यासाठी अगोदर एलआयसीच्या होमपेजवर तुम्हाला जावे लागेल. या संकेतस्थळावर सर्वात खाली दावा न केलेल्या रक्कमेविषयीची लिंक तुम्हाला शोधावी लागेल. ही लिंक पेजवर सर्वात खाली शोधल्यानंतर तुम्हाला दिसून येईल.
त्याठिकाणी ही लिंक मिळत नसेल तर, https://customer.onlinelic.in/LICEPS/portlets/visitor/unclaimedPolicyDue… वर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा सर्व तपशील भरा. बिनचूकपणे ही माहिती जमा केल्यावर थकीत रक्कमेची माहिती मिळते.
जर या पद्धतीने तुम्हाला थकीत रक्कम शोधण्यात अडचण येत असेल तर तुम्हाला एलआयसी कार्यालयात जाऊन मदत घेता येईल. कार्यालयात जाऊन अर्ज द्यावा लागेल. KYC आणि पॉलिसीचा तपशील दिल्यावर रक्कमेवर दावा सांगता येईल आणि ही रक्कम काढता येईल.